जामनेर पं.स.सभापती निता पाटील यांचा नुकसानग्रस्तांना मदतीचा हात

0

जामनेर,-
येथील पंचायत समितीच्या सभापती निता कमलाकर पाटील यांच्याकडून एक हात मदतीचा, एक हात माणुसकीचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला असुन या समाजोपयोगी उपक्रमातुनच तालुक्यातील पाळधी येथील रहिवाशी दिपक जाधव यांना भांडी,कपडे, अन्नधान्य आदी संसार उपयोगी वस्तुंचे नुकतेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी दिपक जाधव यांच्या घराला अचानक आग लागल्यामुळे घरातील रोख रक्कम,कपड्यांसह घराची राखरांगोळी होऊन नुकसान झाल्याने संपूर्ण कुटुंबच उघड्यावर आले होते अशा कठीण परिस्थितीत मदत केल्याने नुकसानग्रस्त दिपक जाधव यांनी सभपती निता पाटील यांचे आभार मानले आहे.साहित्य वाटप करतांना पाळधीचे माजी सरपंच कमलाकर पाटील,ग्रा. पं.सदस्य जीवन पाटील,महेंद्र पाटील,गणेश पाटील,विनोद कोळी,अभिषेक पाटील,गोलु पाटील,हरिदास भिल,दिपक जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.