आ. स्मिता वाघ यांना 1 लाखाचेवर मताधिक्य मिळवून देऊ भाजपचा पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांचा निर्धार

0

जळगांव –
आगामी 17 व्या लोकसभेसाठी पदाधिकारी कार्यकत्यार्ंनी गाफील न रहाता आपआपल्या वार्ड प्रभागात घरोघरी संपर्क करून भाजपाचे खासदारपदाचे उमेदवार आ. स्मिता वाघ यांना शहरपरीसरातुन किमान 1 लाखाचे मताधिक्य मिळवून विजयी करण्याचे आवाहन आ. राजुमामा भोळे यांनी भाजपा जिल्हा कार्यालय वसंतस्मृती येथे आयोजीत पदाधिकारी कार्यकत्यांचे बैठकीत केले.
लोकसभेसाठी आ. स्मिता वाघ यांना पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झाली असून पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उमेदवार ाआपल्या वार्डात शहरात येतीलच. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारांना प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क करण्यासाठी मिळणारा वेळ कालावधी अत्यंत कमी आहे. जिल्हयात दोन मतदारसंघापैकी जळगांव लोकसभा मतदार संघात 7 तालुके असून प्रत्येक तालुका पातळीवर भाजपाचे उमेदवार आ. स्मिता वाघ ह्या करित असून शहरात देखिल त्यांना वेळ देता येईल. तसेच निवडणूक आयोगाच्या विविध ठिकाणच्या परवानगी पहाता पदाधिकारी कार्यकत्यांनी उमेदवार येतीलच हा अट्टाहास न धरता आपआपल्या परीने शहरातील आपआपल्या वार्ड प्रभागात व्यापारी, दुकानदार डॉक्टर वकील अन्य व्यावसायीक यांचेशी प्रत्यक्ष भेटी घेउन आपला संपर्क करावा व आपल्या शहरात मतदारांचे मतदान टक्का वाढवून भाजपाच्या उमेदवाराला किमान 1 लाखांचे मताधिक्य मिळवून विजयी करण्याचा निर्धार करा असे आवाहन आ. भोळे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.