अपघात झालेल्या रिक्षाच्या टायरची चोरी

0

अपघातामुळे दोघांना कायमचे अपंगत्व

पाचोरा दि.24 –
मोढांळे रोडवर दि. 21 रोजी भरधाव येणार्‍या कारने पॅजो रिक्क्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्क्षा पलटी होवुन चार जण जखमी झाले होते. जखमीतील संगिता अशोक पाटील यांचा उजवा पाय तर भाऊसाहेब गुलाबराव देशमुख यांचा डावा पाय गुडघ्या पासुन कापावा लागल्याने त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. पॅजो रिक्क्षा अपघातस्थळी पडुन असल्याने दि. 23 रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रिक्क्षाचे तिन्ही टायर चोरुन नेल्याची घटना घडली.
निंभोरी बु ता. पाचोरा येथील अशोक पाटील हे दि. 21 रोजी गावात भिषण पाणी टंचाई असल्याने स्वत:ची रिक्क्षा (क्रं. एम.एच.19 क्यु. 0740) या रिक्क्षात पिण्यासाठी पाणी घेऊन जात होते. दरम्यान समोरुन एम.एच.19. ए.एक्स. 0719 कारचालक दिपक मोरे हा वाडी कडुन पाचोर्‍याकडे अतिशय भरधाव वेगाने कार चालवित असतांना रिक्क्षाला धडक दिल्याने रिक्क्षातील संगिता अशोक पाटील, भाऊसाहेब गुलाबराव देशमुख, दादाराव व्यकंटराव शेळके, विष्णु सुभाष नलावडे, कार्तिक अशोक पाटील, रिक्क्षा चालक अशोक पाटील हे रिक्क्षा पलटी झाल्याने जखमी झाले होते. यात संगिता अशोक पाटील यांचा उजवा पाय व भाऊसाहेब गुलाबराव देशमुख यांचा उपचारा दरम्यान डावा पाय गुडघ्या पासुन कापावा लागला. पिण्याच्या पाण्यामुळे दोघांना कायमस्वरूपी अपंगत्व आले. दरम्यान अशोक पाटील यांची पॅजो रिक्क्षा घटनास्थळीच पडुन असल्याने अज्ञात चोरट्यांनी रिक्क्षाचे तिन्ही टायरची चोरी करुन नुकसान केले.

Leave A Reply

Your email address will not be published.