मदत करता आली नाही तरी चालेल, परंतु चुकीच्या बाबींना विरोध करा-रूपाली वाघ

0

जळगांव. दि.24-
सामाजिक कार्य करीत असतांना अनेक बरे वाईट अनुभव आलेत. सर्वसामान्यांच्या मदत मिळाल्याचा जो आनंद होतो हेच माझे समाधान आहे. परंतु महिलाच महिलांच्या विरोधक असून बर्‍याच ठिकाणी कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातो. असे न करता कोणाला मदत करता आली नाही तरी चालेेल पण चुकीच्या बाबींना विरोध करा समर्थन करू नका असे मनोगत सर्वश्री चिंतामणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका सामाजिक कार्यकत्यार्ं रूपाली वाघ यांनी लोकलाईव्हच्या मुलाखतीत व्यक्त केले.
एकाद्या व्यक्तीला मदत मिळाल्यानंतर जे समाधान मिळते ते खरे यश असून समाजात अनेक ठिकाणी कौटुंबिक वाद होत असतात अशा व्यक्तींना योग्य ते मार्गदर्शन वेळेवर मिळावे, त्यांना पोलीस ठाण्यापर्यत न जाउ देता त्यांच्यातील वाद आपसात सामंजस्याने निराकरण तसेच समुपदेशन करणे हे ध्येय आहे. जेथे अन्याय होत असेल तेथे अन्यायाविरूद्ध जनजागृती करणे आवश्यक आहे. दोंडाईचा येथे अत्याचार पिडीत शालेय विद्यार्थीनीची भेट घेउन शालेय परीसराची माहिती जाणून घेतली. त्या शाळेत येणार्‍या अभ्यागतांना शाळा परीसरात प्रवेश देण्यापासून ते सुरक्षा व्यवस्था, सीसीटिव्ही कॅमेरे व्यवस्था असणे गरजेचे आहे हे स्थानिक प्रशासनाच्या नजरेत आणून दिले. याची संहिता इतर शाळा महाविद्यालयांनी देखिल करणे अवलंबन केले.
शहर परीसरात रात्रीच्या वेळी रिक्षातुन प्रवास करीत असतांना महिला प्रवाशांना अनेक अनुचित प्रसंगांना सामोरे जावे लागते. या घटना घडु नये यासाठी पोलिस ठाण्याचा वा अन्य संपर्क होत नसतांना केवळ प्रवास करणार्‍या महिलांनी रूपाली वाघ नावाचा उल्लेख झाला तरी रिक्षा चालक दचकुन असतात, रिक्षा चालकांसाठी तो उल्लेख पुरेसा असतो. महिलांनी आर्थिक दृष्टया स्वावलंबी व्हावे यासाठी दिवाळीच्या दिवसात दिवे पणत्या, वाती यासह फराळाचे पदार्थ, पापड बनवून त्यातुन स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला.
विशेषतः वैद्यकिय आरोग्य, औषधोपचार, रूग्णालय आदी सामाजिक मदत ना . गिरीष महाजन यांच्या माध्यमातुन बरेच वेळा मिळालेली आहे. शहरातील एका युवकाचे नुकतेच लग्न झाले होते. काही कालावधीतच त्यास अपघात झाला. या अपघातात त्याचा एक पाय जायबंदी झाला त्यास उपचारार्थ दाखल करून योग्य ती वैद्यकिय मदत उपलब्ध झाली. त्यानंतर त्यास शस्त्रकियेनंतर कृत्रिम अवयव देखिल करीत या सामाजिक कार्याच्या माध्यमातुन उपलब्ध करून दिली त्यानंतर त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर जे समाधान पहावयास मिळाले त्यात खरा आनंद आहे.
यासोबतच दान या चित्रपटात देखिल काम करण्याची संधी मिळाली. अपघातग्रस्त मुलाचा मेंदु कार्य करेनासा झाल्यानंतर त्याच्या शरीरातील अन्य अवयव दान केल्यास मृत्युपश्चात अवयवांच्या माध्यमातुन व्यक्ती जिवंत राहु शकतो हे अवयवदानाच चित्रपटाव्दारे महत्व विषद करण्यात आले आहे.
शहर परीसरात तंटया भिल सोसायटीत सर्वसामान्य महिलांना हळदी कुंकवाचे वाण दिल्यानंतर जो आनंद झाला ते पाहुन सामाजिक कार्य केल्याचे समाधान मिळते. यासह अनाथआश्रम बालकाश्रम आदी ठिकाणच्या बालकांना फळ वाटप केले जाते. हे सर्व करण्यासाठी लागणारे अर्थसहाय्य सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रम जसे होळी, रंगपंचमी भागवत सप्ताहांच्या माध्यमातुन तसेच लोकसहभागातुन मिळते

Leave A Reply

Your email address will not be published.