चाळीसगावात मंगेश चव्हाणांच्या “विजयपर्वाची” ताकत !

0

चाळीसगाव : शिवसेना-भाजप-आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे चाळीसगाव मतदार संघाचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी भाजपा तर्फे चाळीसगाव येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जनसमुदायाकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

चाळीसगाव येथील सीताराम पैलवान मळा येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रचार कार्यालयापासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नेते, पदाधिकारी व जनसमुदाय उपस्थित होता. या उपस्थितीमुळे संपूर्ण चाळीसगाव शहराला यात्रेचे स्वरूप आले होते. ढोल ताशा आणि वाद्यांच्या गजरात रॅलीस प्रारंभ झाला. ठिकाणी सप्तरंगी रांगोळ्यांनी रॅलीची शोभा वाढविली. या रॅलीत महिलांची संख्या लक्षणीय होती. शहरातील कॅप्टन कॉर्नर, सिग्नल पॉईंट, तहसील कचेरी आदी ठिकाणांवरून रॅली काढण्यात आली.

यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील, नामदार गिरिषभाऊ महाजन यांचे स्वीय सहाययक  आरोग्यदूत रामेश्वरभाऊ नाईक, माजी केंद्रीय मंत्री एम. के. पाटील, नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण, जामनेर नगरपालिका सभापती धोंडू आप्पा, विश्वासभाऊ चव्हाण, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, प्रीतमशेठ रावलानी, माजी आमदार साहेबराव घोडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य यु. डी. माळी सर, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस कैलास बापु सूर्यवंशी, जि. प. शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे, जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजीव पाटील, अंबाजी ग्रुप चे चेअरमन चित्रसेन पाटील,  रासप जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंगाडे, शिवसेनेचे जिल्हा संघटक महेंद्र पाटील, रयत क्रांती चे अजय पाटील, रासप चे रवींद्र पाटील, रिपाईचे जिल्हाध्यक्ष आनंद खरात, भाजपा तालुकाध्यक्ष के.बी. साळुंखे, शिवसेना तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण, नगरसेविका विजया ताई पवार, डॉ.अस्मिता पाटील, प्रतिभाताई पवार, पं स सभापती सौ.स्मितल बोरसे, महिला आघाडी च्या बेबाताई, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, शिवसेना शहराध्यक्ष नानाभाऊ कुमावत, सरपंच संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर महेंद्रसिंग राठोड, माजी शहराध्यक्ष अविनाश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे, महिला आयोगाच्या सदस्या देवयानीताई ठाकरे, मार्केट कमिटीचे सभापती रवीआबा पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजूभाऊ राठोड, राजेंद्र चौधरी, नाशिकचे आरटीओ ए. पी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते के. आर. पाटील, माजी पंचायत समिती सदस्य शेषराव पाटील, एॅ. विनय दाभाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख पप्पू पाटील,

सुनीताताई पाटील, डॉक्टर वसंत सूर्यवंशी, नानासाहेब पवार, सुदाम चव्हाण, अविनाश नाना चौधरी, अविनाश सूर्यवंशी, डॉक्टर रमेश निकम, प्रशांत पालवे, अमोल नानकर व सर्व आजी-माजी जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व आजी-माजी मार्केट कमिटी सभापती, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख गट, प्रमुख व  गणप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्‍या मनोगतात मंगेश चव्‍हाण म्‍हणाले की,पक्षाने मला जरी उमेदवार म्‍हणून जनतेसमोर उभ केले असले तरी इथल्‍या प्रत्‍येकाने स्‍वतः उमेदवार समजून पक्षाला विजयी करावे, लहानपणापासूनच गरीबीचे चटके सोसले आहे त्‍यामूळे आयूष्यात कोणावरही अन्‍याय हाेवू देणार नाही. सर्वाच्‍या साथीने विकासाचा रथ ओढू. मला संधी देवून पूढील पाच वर्षे जनतेचा नोकर म्‍हणून काम करण्याची संधी द्या आपण दाखवलेल्या विश्‍वासाला मी नक्‍कीच पात्र ठरेल. माझी आमदारकी ही जनतेचीच आहे असे प्रतिपादन मंगेश चव्‍हाण यांनी उपस्‍थितांना केले.

एम. के. आण्णा पाटील, डॉ. संजिव पाटील, चित्रसेन पाटील, राजूभाऊ राठोड, सूरेश सोनवणे, देवयानी ठाकरे, ऍड. विनय दाभाडे, राजेंद्र चौधरी, घृष्णेश्वर पाटील यांनी आपल्‍या मनोगतात पक्षाने अतिशय हूशार व प्रामाणिक उमेदवार दिला आहे. आपल्‍या सर्वानी आपन स्‍वतः उमेदवार समजून पक्षाला विजय मिळवून देण्याच्या काम करा. भारतीय जनता पक्ष हा प्रत्‍येक कार्याची दखल घेत असते. त्‍यामूळे शक्‍य त्‍या पध्दतीने जास्‍तीत जास्‍त पक्षाला मतदान कसे होईल यासाठी मेहनत घ्यावी असे आवाहन करण्यात आले. प्रा.सूनिल निकम यांनी सूत्रसंचालन केले तर आभार के बी साळुंखे यांनी मानले मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.