वृद्धाच्या पिशवीला कापून १ लाख रुपये केले लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमधील खात्यातून पैसे काढून बँकेत जाणाऱ्या वृद्धाच्या पिशवीला कापून अज्ञात चोरट्यांनी १ लाख रुपये लंपास केल्याची घटना आज घडली.

देवराम बाबुलाल चौधरी ( वय ७२, रा. रामेश्वर कॉलनी, एकनाथनगर) हे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांनी जळगाव शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यात दीड लाख रुपये बचतीतून जमवले होते. पोस्टातील बचत खात्यात व्याज कमी मिळते म्हणून त्यांना ते पैसे इतर बँकेतील खात्यात टाकायचे होते. त्यासाठी घरी आणलेले पैसे काढण्याची स्लिप त्यांनी नातवाकडून भरून घेतली आणि पोस्ट ऑफिसमधून आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास पैसे काढले.

पैसे काढल्यावर पोस्टातील रोखपाल महिलेला त्यांनी ही दीड लाखाची रक्कम पुन्हा मशीनवर मोजून दाखवा असा आग्रह धरला होता. त्यावर हे पैसे मोजलेले आहेत आणि दर्शनी भागातील नोटा मोजणारे यंत्र खराब झालेले आहे असे या रोखपाल महिलेने त्यांना सांगितले. त्यामुळे नंतर जवळपास २० मिनिटे पोस्टातच देवराम चौधरी यांनी स्वतः या नोटा मोजून पाहिल्या. या वेळेत त्यांच्याकडे असलेली ही रक्कम अनेकांच्या निदर्शनास आली असावी आणि तेथूनच त्यांच्यावर चोरट्यांनी पाळत ठेवली असावी, असा तर्क लावला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.