विराज कावडीया युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदी निवड

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील विराज अशोक कावडीया यांची युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदावर निवड करण्यात आली आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना प्रमुख राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टचार मंत्री मा.श्री.आदित्यसाहेब ठाकरे आणि युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांनी ही निवड जाहीर केली आहे.

शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आजवर केलेल्या वाटचालीचे हे फळ आहे. पक्षश्रेष्ठींनी युवासेनेच्या विस्तारासाठी दिलेली ही संधी आव्हानातमक आणि मोठी आहे.  शिवसेना, युवासेनेचे सर्व पदाधिकारी, सहकारी तसेच शिवसैनिकांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू, असा  विश्वास विराज कावडीया यांनी व्यक्त केला आहे.

विराज कावडीया हे वयाच्या १६व्या वर्षांपासून म्हणजेच विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. युवाशक्ती फाउंडेशनची सन २००८ साली स्थापना करीत त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. विराज कावडीया यांना २०१५ साली महाराष्ट्र शासनाचा आदर्श युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असतानाच, त्यांची धडाडी व संघटन कौशल्य पाहून त्यांना शिवसेनेचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी २०१८ साली जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक लढण्यासाठी सर्वात कमी वयाचा व युवा उमेदवार म्हणून शिवसेनेचे तिकीट दिले. थोड्याश्या मतांनी त्यांचा पराभव झाला. या नंतर सुद्धा कावडीया हे सतत शिवसेनेच्या वाढीसाठी व नागरिकांच्या हितासाठी शहरात अग्रेसर राहून कार्य करीत होते. याचीच दखल घेत त्यांना अलीकडेच जळगाव शहर महानगरपालिकेत शिवसेनेच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक पद जाहीर करण्यात आले असून लवकरच याची अधिकृत प्रक्रिया येणाऱ्या महासभेत पूर्ण होणार आहे. या सर्व सक्रिय व सकारत्मक कामाच्या पार्श्वभूमीवर त्यांना युवासेनेच्या राज्यस्तरावर सहसचिव म्हणून महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युवासेनेच्या स्थापने पासून प्रथमच जळगाव जिल्ह्याला, युवासेनेच्या राज्य कार्यकारणीत पद प्रदान करण्यात आले आहे. सदर बाब जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

शिवसेनेचे संघटन मजबूत करणारा आणि सामान्यांना शिवसेनेशी जोडणारा तरुण, धडाडीचा कार्यकर्ता म्हणून कावडीया ह्यांची ओळख आहे. हीच ओळख भविष्यात अधिक गडद व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून या नियुक्तीचे अभिनंदन व स्वागत माजी मंत्री सुरेश दादा जैन, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबरावजी वाघ, युवासेना विस्तारक कुणालजी दराडे, अजिंक्यजी चुंभळे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख हर्षल माने, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदाताई पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना युवती विस्तारक डॉक्टर प्रियांका पाटील, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराजजी पाटील व सर्व शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्याने यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.