विनाबिलांचा सिमेंटच्या गोण्या घेऊन जाणारा ट्रक ताब्यात

0

भडगाव  – विनाबीलांचा सिमेटचा गोण्या भरलेला ट्रक चाळिसगाव कडून भडगावकडे येत असताना नगरदेवळा स्टेशन येथे भडगाव पोलिस रात्री पेट्रोलिंग जवळ आढळला असून ट्रक चालकावर भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून सिमेंट बॅग भरलेला ट्रक जमा करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी- विजय पंडित पाटील पो. कॉ. भडगाव पोलिस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलिस उप निरीक्षक सुशील सोनवणे, पो. ना. प्रल्हाद शिंदे, पो. ना. लक्ष्मण पाटील, ईश्र्वर पाटील, हे रात्री कजगाव येथे पेट्रोलिंग साठी जात असताना तालुक्यातील नगरदेवळा स्टेशन येथील पुलाजवळ चाळिसगाव कडून भडगाव कडे ट्रक क्र. एम. एच.18 एम 8709 हा ट्रक अवजड सामान घेऊन जात असताना दिसली व याची विचारपूस केली असता त्यामध्ये सिमेंट गोण्या आहे. त्या कोणाच्या मालकीच्या आहे , कोठून आणल्या असे विचारणा केली असता काहीही समाधान कारक उत्तर दिले नाही. म्हणून भडगाव पोलिस स्टेशन ला चालक नितीन विलास धात्रक रा. गल्ली न 6 भगवा चौक धुळे याच्या विरूद्ध पोलिस नॉन काँग्नेजेबल प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व ट्रक जमा करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सुशील सोनवणे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.