विद्यार्थ्यांच्या राड्याने नूतन मराठाचे उमंग झाले बेरंग!

0

जळगाव, दि.2 –
शहरातील मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या नूतन मराठा महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंम्मेलन उमंग-2018 शुक्रवारपासून सुरू झाले. सकाळी 10.30 पासून सुरू झालेल्या स्नेहसंम्मेलनात धक्काबुक्कीवरून 5 वेळा विद्यार्थ्यांच्या हाणामार्‍या झाल्या. दुपारी 4 वाजता झालेल्या हाणामारीमध्ये बाहेरून आलेले काही विद्यार्थी सहभागी झाल्याचे आढळल्यानंतर उमंग आटोपते घेण्यात आले.
सध्या महाविद्यालयांमध्ये स्नेहसंम्मेलनाची धूम सुरू आहे. नुकतेच मू.जे.महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन पार पडले. शुक्रवारपासून नूतन मराठा महाविद्यालयाच्या उमंग-2018 ला सुरूवात झाली. सकाळी 10.30 वाजता उदघाटन झाले.
दुपारी 12 वाजेच्या सुमारास मंडपात नाचताना झालेल्या धक्काबुक्कीमुळे बीएसस्सीच्या तिसर्‍या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या मिलींद साठे या विद्यार्थ्याला 30-40 विद्यार्थ्यांनी बेदम मारहाण केली. हाणामारी मिलींद याचे शर्ट देखील फाटले होते. मारहाण करणारे विद्यार्थी व इतर तरूण जळगावातीलच असल्याचे समजते.
दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास सौरभ देवकर या विद्यार्थ्याला देखील नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली.
विद्यार्थी हजार, पोलीस मोजके
नाचण्याच्या कारणावरून आणखी तीन वेळा हाणामारी झाली. महाविद्यालयाच्या आवारात हजारो विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मोजकेच पोलीस कर्मचारी असल्याने गोंधळ अधिक झाला.
बाहेरच्या मुलांचा गोंधळ
महाविद्यालयात स्नेहसंम्मेलन सुरू असताना बाहेरून भिंतीवरून उड्या घेत आलेल्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याने वाद आणखीनच वाढत होते.
4 वाजता आटोपले स्नेहसंम्मेलन
दुपारी 4 वाजेच्या सुमारास नाचताना दोन गटात तुफान हाणामारी झाली. शिक्षकांनी एका गटाला आवरल्यानंतर रंगमंचाच्या मागील बाजूला बाहेरून आलेल्या काही तरूणांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांना शिक्षकांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बाहेर पळ काढला. धावपळ पाहून उपस्थित सर्वच विद्यार्थी महाविद्यालयाबाहेर पळाले. त्यामुळे स्नेहसंम्मेलन आटोपते घेण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.