जळगावकरांसाठी पुणे आता दूर नाही; सोमवारपासून घ्या भरारी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

गेल्या महिन्यात गोवा – जळगाव – हैदराबाद अशी विमान सेवा विमानतळावरून ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीने सुरू केली आहे. सोबतच पुण्यासाठी देखील विमान सेवा सुरू करण्यात यावी अशी जळगावकरांची मागणी होती. यासाठी मिळणारा चांगला प्रतिसाद पाहता आणि पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता सोमवार, २७ मेपासून पुणे येथे विमान सेवा सुरू करत आहे. ही सेवा आठवड्यातून चार दिवस असणार आहे.
विमान कंपनीने २७ मे ते २६ ऑक्टोबरदरम्यान गोवा-जळगाव-पुणे या विमान सेवेचे शेड्युल तयार केले आहे. त्यानुसार तिकीट बुकिंगलादेखील सुरुवात झाली आहे. यात गोवा-जळगाव-गोवा ही सेवा दररोज तर पुणे-जळगाव-पुणे ही सेवा आठवड्यातील मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशी राहील.
भारत सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मान्यतेनुसार, उड्डाण ५.० योजने अंतर्गत जळगाव विमानतळावरून ‘फ्लॉय ९१’ विमान कंपनीने विमान सेवा सुरू केली आहे.
विमान कंपनीने २५ व २६ रोजी जळगाव ते पुणे अशी विमान सेवा दोन दिवस ट्रायल बेसवर घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गोव्यावरून जळगावला तर जळगाववरून पुण्याला व पुण्यावरून जळगाव आणि नंतर गोव्याला विमानाने शुक्रवारी उड्डाण केले.

Leave A Reply

Your email address will not be published.