विक्रम गोखलेंचे डोकं ठिकाणावर आहे काय?

0

चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्री हे त्यांच्या कलेच्या क्षेत्रातील कामगिरीमुळे त्यांची लोकप्रियता वाढल्याने  प्रेक्षकांच्या गळ्यातील ते ताईत बनतात. सेलिब्रिटी म्हणून त्यांना लोक ओळखतात याचा अर्थ कलेचं क्षेत्र सोडून राजकारणाविषयी वक्तव्ये करणं हा त्यांचा प्रांत नाही. हिंदी सिनेमातील अभिनेत्री कंगना राणावत आपल्या कलेच्या क्षेत्राऐवजी राजकारणाविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्यात माहीर आहे. विशेषत: केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारविषयी जणू भाजपच्या प्रवक्तेपदाची भूमिका पार पाडण्यामागे महाराष्ट्रातील महाविकास आघडी सरकारच्या विरोधात विशेषत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांची शिवसेना यांचेसंदर्भात अशीच वादग्रस्त वक्तव्ये करून प्रकाशझोतात राहिली.

कंगनाला केंद्र सरकारने झेड सिक्युरिटी दिली आहे. भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा महोत्सव साजरा करत असतांना कंगना राणावतने 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य भिक मागून मिळालेले स्वातंत्र्य होते. खरे खुरे स्वातंत्र्य 2014 पासून मिळाले आहे. केंद्र शासनाकडून राष्ट्रपतींच्या हस्ते कंगनाला पद्मश्री किताब देण्यात आल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना कंगनाने हे माथेफिरू वक्तव्ये केले. कंगनाच्या वक्तव्याचा संपूर्ण भारतभर निषेध होत असतांना मराठीतील आणखी एक अभिनेते विक्रम गोखले यांनी त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पत्रकारांशी बोलतांना अभिनेत्री कंगना राणावतच्या वक्तव्याचे समर्थन केले.

अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं  मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून वयाच्या 75 व्या वर्षी विक्रम गोखलेंचे डोके ठिकाणावर आहे काय असा प्रश्न विचारण्याचा सुध्दा आहे. ‘साठी बुध्दी नाठी’ ही म्हण विक्रम गोखलेंच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्या हुतात्म्यांनी आंदोलन करून फासावर गेले तेव्हा त्यांचे प्राण वाचवण्यासाठी तत्कालिन राजकीय नेत्यांनी काही प्रयत्न केले नाहीत, असा आरोप विक्रम गोखलेंनी केले आहे. याचा अर्थ राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि त्यांच्या अहिंसावादी आंदोलनाचा विक्रम गोखलेंनी अपमान केलाय. 1947 ला स्वातंत्र्य भिक मागून मिळाले अशी रीघ ओढून केंद्रातील भाजप सरकारकडून काही तरी गोखलेंना पदरात पाडून घ्यायचे आहे काय? वयाची 75 वर्षे पूर्ण करणाऱ्या विक्रम गोखलेंचे हे वक्तव्य निषेधार्हच आहे. आम्ही त्यांचा निषेधच करतो.

महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापासून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाचे मिळून उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत आहे. परंतु महाराष्ट्रात पुन्हा भाजप आणि शिवसेना युतीचे रसकार आले पाहिजे त्यासाठी स्वत: विक्रम गोखले म्हणतात. शिवसेना -भाजपत समन्वय घडवून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची मल्लीनाथी सुध्दा वाढदिवसाच्या निमित्ताने प्रतिक्रिया व्यक्त करतांना केली. त्यासाठी गोखले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांचेशी बोलणार असल्याचेही सांगून टाकले आहे. अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्री दिले तर भाजपचे बिघडणार कुठे? असा प्रश्नही ते पत्रकारांना विचारतात.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांचेबाबत विक्रम गोखलेंचे एवढे सख्य होते तर दोन वर्षापूर्वी भाजप – सेनेची युती बिनसली. भाजपपासून सेना बाहेर पडली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर एकत्र येऊन महाविकास आघाडीची सत्ता आली. त्यावेळी विक्रम गोखले गप्प का होते? दोन वर्षानंतर ही त्यांना पुळका का आला? शिवसेनेचे संस्थापक हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी आपलं  आयुष्य घालवलं . त्यांच्या भाषणांनी मराठी माणसांमध्ये  स्फुलिंग निर्माण केले. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने भाजपला काडीमोड घेतल्याचं अतिव दु:ख विक्रम गोखलेंना झाल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून जाणवले.

कै. बाळासाहेब ठाकरे हे विक्रम गोखलेंचे जवळचे नातेवाईक आहेत. आणि त्यांच्या शिवसेनेने चुकीचं पाऊल उचललं असं विक्रम गोखलेंना का वाटतं. म्हणून ते आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात समन्वयकाची भूमिका बजावणार आहेत चांगली गोष्ट आहे. विक्रम गोखलेंच्या प्रयत्नाला जर महाराष्ट्रात यश आले तर भाजपवाले विक्रम गोखलेंना डोक्यावर घेऊन नाचतील. परंतु वयाच्या 75 व्या वर्षी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे गोखलेंनी दाखवून दिले आहे. असो त्यांच्या प्रयत्नाला यश येवो आणि महाराष्ट्रात सेना -भाजप युतीचे सरकार येवो. परंतु विक्रम गोखलेंच्या 1947 साली स्वातंत्र्य भिक मागून मिळाले या वक्तव्याचा मात्र आम्ही निषेधच करतो.

Leave A Reply

Your email address will not be published.