वाहत्या नाल्यात तरुणांनी उड्या घेत वाचवले कुत्र्याचे प्राण.. (व्हिडीओ)

0

 अमळनेर:-  तालुक्यातील  शिरूड परिसरासह आज सकाळच्या सुमारास पश्चिम दिशेस मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शिरूडकडे वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामुळे गावातील नाले पूर्णपणे भरून ओसांडत होते. वाहत्या पाण्याला बघण्यासाठी त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची  गर्दी जमली होती.

युट्यूब लिंक👇

त्या वाहत्या पाण्याच्या बाजून एक कुत्रा जात असताना अचानक पणे  वाहत्या पाण्यात   कुत्र्याचा तोल गेल्याने तो त्या वाहत्या पाण्याच्या नाल्यात पडला. तो नाला पूर्णपणे खोल असल्याने  त्यावरून पाणी ओसंडून वाहत होते. त्या कुत्र्याला वर येणे शक्य न होते. त्या कुत्र्याने पाण्यातुन वर येण्यासाठी  खूप अतोनात प्रयत्न केले. आपल्या हातपायांची झटापट करत वर मान   काढत बाहेर येण्याचा प्रयत्न तो करू लागला, मात्र पाणी जास्त असल्याने त्या पाण्याचा प्रवाह जोरात होता. ते त्या कुत्र्याला ते शक्य झाले नाही.  त्या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्या ठिकाणी असलेल्या काही तरुणांनी आपल्या हाताची साकळी  तयार करत कुत्र्या पर्यँत पोहचण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शक्य झाले नाही. तर कोणी दोर टाकून तर कोणी लांब काठीने त्याला ओढण्याचा देखील प्रयत्न केला. ते देखील शक्य झाले नाही. पाण्याचा प्रवाह वाढत चालला होता कुत्रा आपल्या जीवाचा आकांत करत होत.

फेसबुक लिंक👇

अशा परिस्थितीत दोन तरुणांनी पाण्यात उड्या घेत पोहत त्याला  पाण्यातून बाहेर काढले. अन त्या कुत्र्याला जीवनदान मिळाले समस्त गावकऱ्यांनी त्या तरुणांचे आभार मानले..

Leave A Reply

Your email address will not be published.