लक्झरी-पिकअप वाहनाची समोरा-समोर धडक; एक ठार, तीन प्रवासी जखमी

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरात  राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर भरधाव लक्झरी व मालवाहु छोटा हत्ती पिकअप वाहन यांची समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात पिकअप वाहनावरील चालकाचा जागीच मृत्यू झाला.  तर दोन सह प्रवासी जखमी झाले. शनिवारी मध्यरात्री हा अपघात झाला.  सुदैवाने लक्झरी उलटली नाही अन्यथा मोठी जीवीत हानी होण्याची भीती होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

सूत्रांच्या माहितीनुसार, यवतमाळ येथून महेंद्र ट्रॅव्हल्सची लक्झरी (जी.जे.19 एक्स.9596) सुमारे 35 प्रवाशांना घेवून भरधाव वेगाने सुरतकडे निघाली असताना भुसावळ येथील रेल्वे उड्डाण पुलाजवळ जळगावकडून भुसावळकडे येणार्‍या मालवाहु पिकअप (एम.एच.18 बी.जी.04) वर आदळली. या अपघातातील पिकअपमधील चालक किशोर निंबा गिरासे ( वय 38, नगावबारी, देवपूर, धुळे) हे जागीच ठार झाले. तर पिकअपमधील अन्य दोघे जखमी झाले तसेच लक्झरी चालकही जखमी झाला.

अपघाताची माहिती कळताच पोलीस उपधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे, पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार व पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. करणी सेनेचे खान्देश अध्यक्ष निखील राजपूत व सहकार्‍यांनी जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवण्याकामी मदत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.