वाचन प्रेरणा दिन साजरा करत गुरुजन व सैनिकांचा सत्कार; दसरा केला हसरा..

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  

शिरूड येथे श्रीदत्त सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने वाचन प्रेरणा दिवस अर्थात माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस व दसरा सणानिमित्त शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम झाला. तसेच यावेळी सैनिक सतिश लोटन पाटील, राकेश नाना पाटील, शंकर दुर्योधन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

पंचायतराज समितीने धरणगाव येथील गटशिक्षणाधिकारी तथा शिरुडचे रहिवासी अशोक बिर्हाडे यांचा अभिनंदनाचा ठराव केल्यामुळे त्यांचा व व्ही. झेड. पाटील हायस्कूल शिरुडच्या शिक्षिका सविता बोरसे यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे व गुरु सेवा मंडळ मोझरी यांच्या वतीने सतीलाल बोरसे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा सपत्नीक विशेष सत्कार करण्यात आला.

तालुका ग्रंथालय संघटनेच्यावतीने शशिकांत पाटील यांची जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच  सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांचाही सत्कार करण्यात आला. जि प शाळा शिरुडचे शालेय समिती अध्यक्ष व हायस्कूल चे शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष यांचाही सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील होत्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्त सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन डी ए धनगर व आनंदराव पाटील यांनी केले. आभार मिलिंद पाटील यांनी मानले.

शिरूड येथील वाचनालयाचा लाभ घेणारे वाचकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गुलाबराव रामभाऊ पाटील, आनंदा संतोष पाटील, पुंजू एकोबा पाटील, राकेश पाटील, अशोक पाटील, भाऊराव पाटील तरुण वाचक केतन दत्तात्रय बोरसे  या वाचकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, सरपंच गोविंदा सोनवणे, प्रा. सुभाष पाटील, माजी सरपंच महेंद्र पाटील, योजना पाटील, विजय पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे, अशोक पाटील, विनायक पाटील, वसंतराव पाटील, भाईदास पाटील, एम एस बैसाणे, दिलीप पाटील, कल्पेश महाजन भाऊसाहेब पाटील सागर पाटील, अलका पाटील, यशवंत बैसाणे, रजनीकांत पाटील, अशोक महाजन, पांडुरंग पाटील, चिंधा भिल, सुकलाल पाटील उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.