UGC कडून नेट पात्र उमेदवारांसाठी भरती; 80,000 पर्यंत पगार

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

नेट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीसह प्रथम श्रेणीसह NET परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांसाठी रिक्त जागा जाहीर केल्यात.

यूजीसी, नवी दिल्लीने शैक्षणिक सल्लागार पदासाठी अर्ज आमंत्रित केलेत. ही भरती कंत्राटी तत्त्वावर होईल. त्यामुळे या पदासाठी पात्र आणि इच्छुक असलेले सर्व उमेदवार शैक्षणिक सल्लागारासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.ugc.ac.in/jobs ला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो. तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 आहे.

यूजीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या नोकरीसाठी प्रोबेशन कालावधी किमान सहा महिने आहे. तसेच कार्यप्रदर्शन पुनरावलोकनाच्या आधारावर ते वाढवता येते. त्याच वेळी यूजीसी कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी सेवा बंद करण्याचा अधिकार राखून ठेवते. त्याचबरोबर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार सवलत दिली जाईल. या पदासाठी उमेदवारांची निवड निवड समितीच्या शिफारशीनुसार केली जाईल. या भरती प्रक्रियेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईट www.ugc.ac.in/jobs ला भेट द्यावी लागेल.

यूजीसीने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 70000-80000 रुपये वेतन दिले जाईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या भरती व्यतिरिक्त यूजीसीने अलीकडेच सहाय्यक प्राध्यापक भरतीसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली. यानुसार, 1 जुलै 2021 ते 1 जुलै 2023 पर्यंत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पीएचडी असणे आवश्यक नाही. गेल्या वर्षी आलेल्या कोविड 19 महामारीमुळे संशोधन कार्य थांबल्यामुळे आयोगाने हा निर्णय घेतला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.