वाघूर धरणाचे ४ दरवाजे उघडले; सतर्कतेचा इशारा

0

जळगाव | प्रतिनिधी 

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाघूर नदीच्या उगमस्थली झालेल्या दमदार पावसामुळे वाघूर धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी या धरणाचे ४ दरवाजे २० सें.मी. ने उघडण्यात आले आहे. धरणातून २७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाण्याच्या विसर्गामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात मागील महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेले अनेक दिवस जिल्ह्यात पावसाची सततधार सुरू होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरण ओवरफ्लो झाले. परंतु या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असता आज पहाट पासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. वाघुर धरण क्षेत्रात संततधार पावसाने जलाशयाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत वाघूर धरणाचे ४ द्वारे २० से.मी. ने उघडण्यात आली आहे व त्या द्वारे २७०० कयुसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे तरी कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये असे आवाहन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.