त्रुटींची पूर्तता केलेले शालार्थ प्रस्ताव बोर्डाकडे पाठवणार

0

पाचोरा | प्रतिनिधी

दि. १४ रोजी दाखला पडताळणी कॅम्पचे आयोजन जळगाव येथे बेंडाळे महाविद्यालयात करण्यात आलेले होते. यावेळी जेष्ठ शिक्षक प्रा. सुनिल गरुड व संघटनेचे विभागीय अध्यक्ष दिनेश पाटील यांनी शिक्षण उपसंचालक कार्यलयाचे सहाय्यक शिक्षण निरीक्षक  दिनेश देवरे यांची भेट घेतली. यावेळी दिनेश देवरे यांनी कार्यलयाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये शालेय स्तरावरील त्रुटी आहेत. अनेक ठिकाणी संस्था शिक्षकांना सहकार्य करत नसल्याने त्याचा विनाकारण त्रास शिक्षकांना होत आहे. कार्यलयाने शालार्थ आय. डी. लवकर मिळावा म्हणून शिबीराचे देखील आयोजन केले होते. मात्र अनेक शाळांनी याकडे पाठ फिरवली. या सर्व बाबींमुळे अगोदरच १५ ते २० वर्षांपासून विनावेतन असलेला शिक्षक सणासुदीच्या दिवसात देखील जरी शासनाने वेतन देण्याचे मान्य केले असले तरी वेतनापासून वंचित आहे. याचे दुःख होत आहे. असे जेष्ठ शिक्षक प्रा. सुनिल गरुड व प्रा. दिनेश पाटील यांच्याशी चर्चा करतांना मत व्यक्त केले.

दोन आठवड्यांपूर्वी पारोळा येथे झालेले शालार्थ आय. डी.  चे त्रुटी पूर्तता केलेले प्रस्ताव शिक्षण उपसंचालक व स्वतः सहायक शिक्षण निरीक्षक म्हणून लक्ष घालुन लवकरात लवकर पूर्ण करून बोर्डाकडे पाठवून आपल्या शिक्षकांना शालार्थ आय. डी.  देण्याचा प्रयत्न आमच्या कार्यलयाचा असेल. शिक्षकांची दिवाळी अंधारात जाणार नाही. याकरिता लवकरात लवकर सर्व कामे मी स्वतः लक्ष घालून पूर्ण करीत आहे. असे दिनेश देवरे म्हणाले.

यावेळी प्रा. दिनेश पाटील यांनी मागील आठवड्यात संघटनेने मा शिक्षणमंत्री यांची भेट घेऊन ऑफलाईन वेतनाची मागणी केली. त्यावेळी राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांनी आतापर्यंत ७० टक्के शालार्थ आय. डी. चे वितरण झाले आहे. उर्वरित शालार्थ आय. डी. चे प्रस्ताव एका आठवड्यात मार्गी लागतील असे आश्वासन मा शिक्षणमंत्री यांना दिले आहे. मागील ३ महिन्यांपासून पगार न मिळालेल्या शिक्षकांची दिवाळी अंधारात जाणार नाही अशी आशा शिक्षकांना आहे.

दिनेश देवरे उपसंचालक विभागाचे शालार्थ प्रस्ताव लवकर पुढे पाठवतील असा विश्वास प्रा. दिनेश पाटील, प्रा. अनिल परदेशी, जेष्ठ शिक्षक सुनिल गरुड, राजेंद्र साळुंखे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.