वरणगावातील ग्रामीण युवकांनी चित्रपट क्षेत्रात टाकले पाऊल…

0

वरणगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

चित्रपट निर्मिती व तेही ग्रामीण क्षेत्रातील कलाकार हे नट-नट्या म्हणजे हिरो-हीरोईन झाले आहेत, हे आपणास सुद्धा माहिती आहे. पण वरणगाव व पिपंळगावच्या युवकांनी महाराष्ट्रातच नव्हे तर सोशल मीडियाच्या युट्युब साईड व सोशल मीडियावर वरणगाव शहराचे नाव डोलाने झळकणार हे मात्र निश्चित आहे.

ही शॉर्ट फिल्म येत्या 28 तारखेला प्रदर्शीत होणार आहे. चित्रपट हे मनोरंजन नव्हे तर त्यामध्ये बरेचसे आत्मसात करण्या जोगे आहे. पुढील भविष्याला वळण देऊन जीवनाला योग्य मार्गाने वाटचाल करत व आपण बघितलेले स्वहपणे साकार करत यशाच्या शिखरावर पोहोचवण्यासाठी येणाऱ्या संकटाना सामोरे जाऊन हे यश मिळवले. ही जिद्द बाळगून कलाकार काम करीत आहेत.

“प्यार जहाँ संघर्षही सर्वं शक्तिमान हें”

हा शॉर्ट चित्रपटाचा टेलर पाहिल्यानंतर क्षणभर वाटते की,सत्यघटनेवर आधारित असलेल्या या सिनेमात विशाल बोदडे (डायरेक्टर), विष्णू राणे (रायटर), सुयोग नाईक (डी.ओ.पी) यातील प्रमुख कलाकार विष्णू राणे, अंकिता बोदडे, अंकुश कुमार(Ak), ऋषिका इंगळे, अजय मेंढे, डॉ. विजय सुरवाडे, कोमल इंगळे, सुनील वाघ, भोला इंगळे, शुभम अवचारे, विजय ठोसर, आनंद हिवरे, संजय डांगे, शुभम मेंढे, पांडुरंग अवचारे, घनश्याम इंगळे, अमोल पाटील, राहुल अवचारे, विशाल इंगळे, रवी इंगळे, आदेश वानखेडे, आदी कलाकारांची दमदार भूमिका आहे. यांनी आपल्या मनोरंजनासाठी आमच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी सदरचा चित्रपट निर्मिती केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.