भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुण जागीच ठार

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळ्याकडून एरंडोलकडे जाणाऱ्या भरधाव  ट्रकने एरंडोलकडून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.

इंद्रसिंग दगडू पाटील (वय २७)  व  भूषण कौतिक पाटील (वय २२) दोघे राहणार जळू येथील युवक जागीच ठार झाले. ही दुर्घटना रविवारी मध्यरात्री घडली. ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,  इंद्रसिंग दगडू पाटील व भूषण कौतिक पाटील हे दोघे युवक एरंडोल कडून एम.एच.२० एफ. क्यू. ७५०५ क्रमांकाच्या  दुचाकीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाने जळू येथे घरी जात असताना शहा पेट्रोल पंप नजीक पारोळ्याकडून भरधाव  येणाऱ्या एम.एच.१९ झेड ४५२७ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात  इंद्रसिंग व भूषण हे दोघे युवक जागीच ठार झाले. इंद्रसिंग पाटील हा शेतकरी तर भुषण पाटील हा युवक औरंगाबाद येथे कंपनीत कामाला होता. दुर्घटना घडली असता ट्रक चालक वाहन सोडून फरार झाला. याबाबत नरेंद्रसिंग पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भाग पाच गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर १५७./२१  भादवि कलम ३०४ अ. २७९, मोटर वेहिकल अँक्ट १३४ व १८४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विलास पाटील जुबेर खाटीक व विकास खैरनार हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.