बोरी नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पारोळा तालुक्यातील बोरी मध्यम प्रकल्प तामसवाडी धरणातील पाणलोट क्षेत्राच्या ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने बोरी धरणात पाण्याची पातळी वाढली असुन आज दि, २३ रोजी दुपार पर्यंत बोरी धरण हे ९२ टक्के भरल्याने केव्हाही या धरणाचे दरवाजे उघडण्यात येऊ शकतात.

म्हणुन बोरी नदी काठच्या गांवाना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. काल सांयकाळी पाणलोट क्षेत्रात भरपुर पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढली असुन धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने केव्हाही धरणाचे दरवाजे उघडुन पाणी बोरी नदीच्या पात्रात सोडण्यात येणार असल्याने आपली जिवित व वित्त हानी टाळण्यासाठी बोरी नदीच्या काठावरील सर्व गांवाना सावधानतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला, असल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.