लोहारा-जळगाव मार्गावरील एकमेव बसफेरी अजुनही बंद ; प्रवाशांची होतेय गैरसोय

0

लोहारा ता.पाचोरा, (ज्ञानेश्वर राजपूत) लोकशाही न्यूज नेटवर्क 

– भाग १

पाचोरा आगाराची लोहारा मार्गे जळगाव लोहाराहून जळगाव जाण्यासाठी सकाळी आठ वाजता एकमेव बसफेरी असतानासुध्दा ती अजूनही बंद असून प्रवाशांची  सेसेहपालट होत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे नाईलाजाने हितचिंतक व ज्यांना बस प्रवासाचे महत्त्व समजते त्यांनाही खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना शोधून प्रवास करावा लागतोय. एकीकडे अनुचित प्रकार झाल्यास रा.प.महामंडळ प्रवाशांना  सुरक्षिततेची हमी देते आणि दुसरीकडे प्रवाशांचे मानसिक हनन केले जात असल्याचा प्रकार होत असल्याने जबाबदार असणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रामुख्याने लाभार्थी व प्रवासीयांकडून होत आहे तर मध्यप्रदेशासारखी प्रवासी वाहतूक खाजगीकारणाची  सुरवात याच मार्गावरून होते की काय? असे वाटायला लागले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दळणवळणावर  मध्यान्न महत्वाच्या बाजारपेठेचे असलेले लोहारा हे गाव येथून बरेचसे प्रवासी, लाभार्थी दैनंदिन जिल्ह्याच्या ठिकाणावर जातात.  याच मार्गावर कासमपुरा, नांद्राफाटा, रोटवद, रोटवदतांडा, मोहाडी, पळासखेडा मिराचे, नेरी अशी अगक्रमाने अजूनही पुढे गावे आहेत, म्हणूनच  खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा डेरा या मार्गावर वळला आहे.  पाचोरा आगाराची लोहारामार्गे जळगाव एकमेव बसफेरी असतानाही बरेचसे  प्रवासी या बसची वाट पाहत असतात, मात्र सर्व मार्गावर खात्रीपूर्वक बसेस सुरु झालेल्या दिसतात, वाढीव बसफेरी तर नाहीच पण जी होती ही एकमेव बस अजूनही बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू आहेत असंच म्हणावं लागेल,

बसेस नाहीत म्हणून पर्याय नाही. वेळेवर कोणत्याही खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाने प्रवास करावाच लागणार.  विशेष आश्चर्य म्हणजे याच मार्गावरील एकमेव बस फेरीचाच गळा का घोटला जातो. याबाबत रा.प. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करायला हवे, अनेकवेळा  प्रामुख्याने दैनिकांनी  सातत्याने प्रकाशझोत टाकला. मात्र लागून असलेल्या कोणत्याही आगरप्रमुखांवर कायम अंमल होवून  फरक पडला नाही. उलट साटलोट झाल असाव? फरक पडला तो लाभार्थ्यांना..  सवलती योजना उरल्या आहेत फक्त त्या कागदोपत्री..  सदर लाभार्थी यांचा तळतळाट थांबवून प्रामाणिक प्रयत्न केल्यास या मार्गावरील बसफेरीना नवसंजीवनी मिळेलच यात शंका नाही व हे लाभार्थी नक्कीच त्यांना आशिर्वाद देतील कारण अति महत्वाचे म्हटले तर अनेक वयोवृद्ध दाम्पत्याना मुल वागवत नाही याकारणी त्यांना आमदनी उपलब्ध नसल्याने मदत नसतेच त्यात हक्काची सवलत बंद प्रकाराबाबत, पालकमंत्री, परिवहन वरिष्ठ अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून हितचिंतक, लाभार्थी, प्रवाशांना न्याय द्यावा अशी मागणी या निमित्ताने होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.