भुसावळात रेणुकामाता देवस्थानात शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ शहरातील  श्रीराम रेणुकामाता देवस्थानामध्ये अश्विनी शारदीय नवरात्रोत्सवाला मोठ्या उत्सवामध्ये सुरुवात झाली.

जागतिक कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून बंद असलेले देवस्थान पुन्हा सुरू करण्यात आल्यामुळे भाविकांमध्ये खूप उत्साहाचे वातावरण बघण्यास मिळत आहे. या मंदिरात देखील कोरोना महामारीचे सरकारने घालून दिलेले सर्व नियमांचे पालन करीत मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा वापर करून भाविकांना दर्शनाची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

बरेच दिवसानंतर मंदिर उघडण्यात आल्यामुळे भाविकांमध्ये दर्शनाची उत्सुकता लागलेली होती. स्थापना सन 2005 मध्ये मंदिराचे संस्थापक श्री विलास भैय्याजी जोशी यांनी केली. गुरुवारी घटस्थापनेच्या दिवशी मंदिराचे पुजारी श्री प्रशांत जोशी यांच्या हस्ते मंदिरात विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. संपूर्ण मंदिरामध्ये काचेची आकर्षक असा देखावा तयार करण्यात आलेला आहे. म्हणून याला काच मंदिर असे देखील संबोधले जाते. मंदिरामध्ये श्रीराम लक्ष्मण व सीता माता तसेच रेणुकादेवीची आकर्षक व मनमोहक अशी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. नवरात्री निमित्त मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.