लाचखोर दोन RTO एजंट एसीबीच्या जाळ्यात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

दहा हजार रूपयांची लाच मागणार्‍या दोन आरटीओ एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केले आहे.

तालुक्यातील खेडी बुद्रूक येथील तक्रारदाराने प्रवासी बस विकत घेतली असून ही बस त्यांना त्यांच्या वडिलांच्या नावावर हस्तांतर करावयाची होती. यासाठी आरटीओ कार्यालयातील एजंट शुभम चौधरी व राम पाटील या दोघांनी तक्रारदाराला दहा हजार रुपये लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची खात्री व पडताळणी करून मंगळवारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरटीओ कार्यालयात सापळा रचून दहा हजारांची लाच घेताना शुभम चौधरी याला रंगेहाथ पकडले. तक्रारीनुसार शुभम चौधरीचा साथीदार आरटीओ एजंट राम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे.

शुभम राजेंद्र चौधरी (वय २३, रा. कोल्हे हिल्स, जिजाऊनगर जळगाव) व राम भीमराव पाटील (वय ३७, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी, महाबळ जळगाव) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने अटक केल्याने आरटीओ कार्यालयाच्या परिसरात खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.