रोहिणी खडसेंचा गंभीर आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला हल्ला

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यानंतर रोहिणी खडसे खेवलकर यांनी या हल्ल्याची आपबिती कथन केली आहे. तीन दुचाकीवरून सात जण आले यात तीन जण हे शिवसेनेचे पदाधिकारी होते एकाच्या हातात पिस्तूल, दुसर्‍याच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. मी कारमध्ये बसलेल्या बाजूने तिघे आले.

यावेळी एकाने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने माझ्या जोराने हल्ला चढविला. मलाच मारण्यासाठी हे तिघेजण आलेले असल्याचेही या वेळी रोहिणी खडसे म्हणाल्या. हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता मात्र मी या हल्ल्याने घाबरणारी नाही. मी महिलांच्या पाठीशी आहे. अशीच कायम उभी राहीन, असेही खडसे यांनी सांगितले.

 राजकीय वैमनस्यातून हल्ला 

राजकीय वैमनस्यातून तसेच वादामुळे शिवसेना पदाधिकार्‍यांनी हा हल्ला केला असे सांगत हल्ला करणार्‍यांची नावेही यावेळी रोहिणी खडसे खेवलकर यांनी सांगितली. यात शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, पंकज कोळी व छोटू भोई या तीन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे खडसेंनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.