रेव्हपार्टीतील खर्‍या गुन्हेगारांना शोधून कडक कारवाई करा!

0

जळगाव दि. 2-
कुठं जातंय आपलं जळगाव, 31 डिसेंबर साजरा करावा का नाही,रेव्ह पार्टीची अपसंस्कृती आपल्या पर्यंत का पोहोचली, यावर लोक लाईव्ह स्टुडिओत झालेल्या चर्चेत शिवसेनेचेे नेते गजाजन मालपुरे, संघ चालक डॉ.विलास भोळे,काँग्रेसचे नेते डाँ. राधेश्याम चौधरी व सामाजिक नेते सचिन नारळे सहभागी झाले होते.
सचिन नारळे- रेव्ह पार्टी हा तथाकथीत विषय आहे, सकारात्मक विषयाकरीता नकारात्मक गोष्टीसाठी सर्वांनी एकत्र यावे व या प्रवृत्तीचा निषेध करावा, आक्षेपार्ह विषय सांस्कृतिक सामाजिक प्रदुर्षण घडवित आहे, आपले भारतीयांचे खरे नववर्ष चैत्रातील गुढीपाडव्यापासून सुरू होते. पाश्चिमात्यांचे अनुकरण आपल्या समाजात होऊ पाहत असून त्यामुळेच अशा रेव्ह पार्ट्यांना ऊत येतो,हे अनुकरण समाजाला काय दिशा दाखवणार
व काय दशा घडवणार? यामुळे सामाजिक, सांस्कृतिक अध;पतन झाले असल्याचे नारळे म्हणाले.
डॉ.विलास भोळे- रेव्ह पार्टी हे टू रेव्ह क्रियापदापासून मादक पदार्थाला, नृत्याला चालना मिळते. व ते त्यासाठीच तयार झाले आहे.त्याचे समर्थन , अनुकरण करणारेच करू शकतात. परदेशातील परदेशीय लोण भारतातही पसरले आहे. परदेशात असलेले भारतीय आपले सण साजरे करतात . शहरात या अगोदरही सेक्स स्कॅडल सारख्या घटना घडल्या असून त्यात या रेव्ह पार्टीची भर पडली आहे, असे डॉ. भोळे म्हणाले.
डॉ. राधेश्याम चौधरी- सानेगुरुजी, बहिणाबाईंचे नाव जगभर पसरले असतांना या घटनेमुळे सांस्कृतिक शहराला धब्बा लागला असून पाप लपविण्यासाठी राजाश्रय घेण्यात आला आहे. घटनेमुळे समाजात चुकीचा संदेश दिला गेला आहे. जळगावचे नावलौकीक घालविले आहे. या घटनेला राजाश्रय मिळत असेल तर त्याचा मी निषेध करतो. यामुळे पोलीस खात्यालाही मान खाली घालावी लागली आहे. हे काळेकृत्य वेदना देवून गेली आहे. पोलीस प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी व खर्‍या गुन्हेगारावर कडक ठोस कारवाई व्हायला पाहिजे, असे डॉ. राधेश्याम चौधरी म्हणाले.
गजानन मालपुरे- ही घटना म्हणजे सामाजिक घात असून सांस्कृतिक अध:पतन आहे. शहरात हिटलर शाहीचे राज्य आल्याची जाणीव होते. पाश्चिमात्यांचे अनुकरण समाजाची काय दशा व दिशा घडविणार? शहरात घडलेली ही घटना निंदनीय आहे, त्याचा मी निषेध करतो. या घटनेने समाजाला वाईट संदेश दिला गेला आहे. या पार्टीला कोणी परवानगी दिली? याचा सखोल तपास करुन खर्‍या गुन्हेगारांवर कारवाई व्हायला पाहिजे, असे मालपुरेे म्हणाले.थोडक्यात या घटनेची सखोल चौकशी होवून खर्‍या गुन्हेगारांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा सूर या लोकचर्चेतून उमटला.

Leave A Reply

Your email address will not be published.