पोलन पेठेतील किराणा दुकान फोडले!

0

नूतन वर्षी रोकडसह सुक्यामेव्यावर चोरांचा ताव

जळगाव दि. 2-
पोलन पेठेतील फुले मार्केट मागील गेट ते चौबे शाळेच्या रस्त्यावर असलेल्या रमेश किराणा दुकानास बुधवारी दि. 2 रोजी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास चोरांनी फोडल्याची घटना घडली. या घटनेत चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्यातील पाच हजाराची रोकड काढत शेजारीच असलेले अंदाजे 2 किलोचे काजूची पाकीटे चोरुन नेले आहेत.
दुकान मालकांना सकाळी 6.30 वा.

पडली होती बंद
चोरी करुन पोबारा करताना चोरांची कार बंद पडली होती. ती चालू करण्यासाठी त्यातील चोरटे धक्का मारण्यासाठी खाली उतरले होते. यादरम्यान गडबड झाल्याने परिसरातील महिलेला जाग आली तिने लाईट लावून पाहिले असता तिला चोरटे दिसल्याचे समजते. दरम्यान रात्री गुरखा येतो मात्र तो पुर्णवेळ न थांबता फेरी मारुन निघून जातो. लाखोंची उलाढाल होत असलेल्या मार्केट परिसरात मात्र सुरक्षा रक्षक नाही. सदर घटनेत पाच हजाराची रोकड व काजुंवर निभावले मात्र मोठी रक्कम असती तर? असा प्रश्न पडतो. त्यामुळे मार्केट परिसराला सुरक्षा रक्षक असावा व पोलिसांनी या भागातील गस्त वाढवावी, अशी मागणी व्यापार्‍यांकडून होत आहे. दरम्यान दुपारपर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम शहर पोलीस ठाण्यात सुरु होते.
अतिक्रमण कारवाई चोरांच्या पथ्यावर
अतिक्रमण हटवितांना मनपा प्रशासनाने थेट दुकानांच्या शटरपासून ओटे तोडले आहेत. त्यामुळे शटरपासून लेवलच नसल्याने लोखंडी टॉमीने शटर वाकविणे चोरांना सोपे झाले आहे. ओटा असता तर शटर वाकविणे अवघड होते. त्याचप्रमाणे ओट्यावरही होणार्‍या घडामोडी सीसीटीव्हीत दिसतात मात्र ओटे नसल्याने ते दिसत नसल्याचे एका व्यापार्‍याने सांगितले.
गल्लीतील लोकांनी दुकान फोडल्याचे मोबाईलवर कळविले. चोरांनी गल्ल्यातील अंदाजे पाच हजार व काजूचे पाकीट चोरुन नेले असल्याचे दुकानाचे मालक संजय कांकरिया यांनी सांगितले. घटनेची माहिती शहर पोलिंसांना कळविल्यावर त्यांनी येवून पाहणी केली व दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज घेवून गेले आहेत. व दुकान सुरु ठेवण्याचे सांगितले.
कारमधून आले चोरटे
दुकानात चोरी करण्यासाठी चार चोरटे कारने आले होते. त्यांनी जॅकीट घातलेले होते त्याचप्रमाणे तोंडाला रुमाल बांधलेला होता. त्यांनी लोखंडी टॉमीने दुकानाचे शटर वाकविले, असे सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसत असल्याचे दुकान मालकांनी सांगितले. चोरांची कार

Leave A Reply

Your email address will not be published.