भोळे महाविद्यालयाचे रासेयो विशेष हिवाळी शिबीर उत्साहात

0

भुसावळ दि.2 –
येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी शिबीर तालुक्यातील साकरी येथील जनता हायस्वूैल येथे पार पडले. 25 डिसेंबरपासून सुरु असलेल्या या शिबीरात विद्याथ्र्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, निरामय जीवनासाठीच्या पद्धती, जाती मुक्त भारत, देहदान, नेत्रदान, अवयव दान, महिला विषयक कायदे, राष्ट्रीय शिक्षण हक्क कायदा, जादू टोणा विरोधी कायदा यासह सामाजिक, आरोग्य आणि विज्ञान या विषयावर विविध तज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन करण्यात आले. शिबीरात राज्यस्तरीय शिबीर मआव्हानफ मध्ये प्रशिक्षीत शिबीरार्थी व विद्याथ्र्यांनी आपत्ती व्यवस्थापनामधील विविध बाबींची माहिती देवून प्रात्यक्षिकांद्वारे प्रशिक्षण दिले. तसेच महिलांमधील जनजागृतीसाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात आरती चौधरी यांनी कचरा व्यवस्थापन आणि शौचालय निर्मीतीबाबत जनजागृती केली. तसेच स्त्री रोग तज्ञ डॉ. दिप्ती चौधरी यांनी वैयक्तीक स्वच्छतेसंदर्भात माहिती दिली. शिबीर काळात स्वयंसेवकांनी जनता हायस्वूैल परिसर, गायत्री मंदिर यासह गावात स्वच्छतेचे कार्य श्रमदानाच्या माध्यमातून केले. तसेच प्रभातपेैरीच्या माध्यमातूनही जनजागृती केली.
या शिबीराचा समारोप 31 रोजी प्राचार्य डॉ. आर. पी. फालक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. प्रसंगी साकरीच्या सरपंच कांचन भोळे, मुख्याध्यापक अनिल गुरचळ उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. आर. पी. फालक यांनी विद्याथ्र्यांनी शिबीर काळात केलेल्या श्रमदानाबाबत समाधान व्यक्त करुन जीवनातील शिस्त आणि समाजोपयोगी कार्यात सहभाग घेण्याचा भावि जीवनात कसा फायदा होतो हे उदाहरणे देवून स्पष्ट केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. आर. एम. सरोदे यांनी तर आभार प्रा. डॉ. दयाधन राणे यांनी मानले. शिबीर यशस्वीतेसाठी शाळेचे माजी विद्यार्थी मयुर महाजन, स्थानिक विद्यार्थी गिरीश राणे, निलेश गोटे, निलेश करांडे यांच्यासह आजी माजी विद्याथ्र्यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.