रिपाई सोशल इंजिनिअरिंगच्या फॉर्मुलानुसार काम करणार-रमेश मकासरे

0

भुसावळ-

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशभरात विविध समाजातील मंडळी पक्षात येत असून आगामी निवडणुकांमध्ये सोशल इंजिनिअरिंगच्या फॉर्मुलानुसार मोठ्या ताकदीने पक्ष उभा राहणार असल्याचे रिपाई आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांनी सांगितले. ते आज दि.२५ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी रमेश मकासरे पुढे म्हणाले की येत्या 27 ऑगस्ट रोजी गवई गटाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी सभापती राजू सूर्यवंशी जिल्हाभरातील त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह,माजी नगरसेविका नंदा निकम प्रकाश निकम सुदाम सोनवणे हे आपल्या सर्व समर्थकांसह लोणारी समाज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात रिपाई आठवले गटात जाहीर प्रवेश करणार आहेत.ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून राजू सूर्यवंशी यांच्याकडे जवाबदारी देण्यात येईल.शहरी जिल्हाध्यक्ष म्हणून नगरसेवक रवींद्र खरात तर जिल्हा प्रमुख आनंद बाविस्कर हे राहतील.गाव तिथे शाखा स्थापन करण्यात येईल.पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी विशिष्ट समाजाच्या व्यक्तींसह सर्व समाज समावेशक कार्यकारिणी करण्यात येणार आहे.समाजाची विभागणी होऊ न देता पक्षाची शक्ती वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेत उत्तर महाराष्ट्र सचिव लक्ष्मण जाधव,रवींद्र तायडे,जिल्हाध्यक्ष रविंद्र खरात,आनंद बाविस्कर,युवा जिल्हाध्यक्ष नितीन ब्राह्मणे, बाळू सोनवणे,प्रकाश सोनवणे,शरद सोनवणे, सुनील अंभोरे,विश्वास खरात, अरुण गजरे,अनिल सोनवणे, रॉकी चाबुकस्वार,भगवान निरभवणे,सुधिर दांडवेकर, शांताराम देशमुख,दादा निकम,पप्पू सुरडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.