म्हसास जि प शाळेत लोकवर्गणीतून गॅस कनेक्शन

0

लोहारा ता पाचोरा
वार्ताहर
जिल्हा परिषद म्हसास शाळेत लोकवर्गणीतून शालेय पोषण आहार शिजवणे साठी नवीन गॅस कनेक्शन घेण्यात आले म्हासास शाळेचा पट 145 असून रोज शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी 15 ते 20 किलो लाकडे लागत होती महिन्याला 3 त 4 किंट्टल लाकडे शालेय पोषण आहार शिजवण्या साठी लागत असे यासाठी वृक्ष तोड होते म्हणून म्हसास शाळेचे मुख्याध्यापक यांनी लोक वर्गणीतून गॅस कनेक्शन मिळावा असा प्रस्ताव 15 आगस्ट रोजी गावातील ग्रामस्थ समोर मांडण्यात आले आपण ही या मराठी शाळेचे देने लागतो आपण सुद्धा याच शाळेत शिकलो आपण ही या शाळेला काहीतरी द्यावे म्हणून गावातील विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन श्री ईश्वर पाटील व सोसायटीचे सचिव सदस्य श्री संदीप श्रावण पाटील संचालक धनश्री कृषी केंद्र यांच्या संयुक्त विध्यमानाने शाळेला नवीन गॅस कनेक्शन 2 सिलेंडर व गॅस शेगडी चे 8 ते 10 हजारांचे साहित्य घेऊन शाळेला सप्रेम भेट दिली
व त्यांच्या हस्ते नवीन गॅस कनेक्शन चे उदघाटन करण्यात आले यावेळी लोहारा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री धुंदाळे साहेब उपस्तीत होते केंद्रप्रमुकानी देणगीदारचे आभार मानून लोहारा केंद्रात 10 जिल्हा परिषदचे शाळा असून तीन शाळांनी लोकवर्गणीतून गॅस कनेक्शन घेतले असून उर्वरीत शाळा सुद्धा गॅस कनेक्शन घेण्यासाठी लोकवर्गणी साठी प्रयत्न करत आहेत प्रत्येक शाळेत गॅस कनेक्शन घेतल्याने वृक्ष तोड थांबेल असे मत त्यांनी व्यक्त केले केंद्रप्रमुखणी शाळेतील मुख्याध्यापक रत्नाकर पाटील व त्यांचे सहकारी शिक्षक प्रवीण भालेराव महेश रोकडे शिवाजी बोरसे व प्राजक्ता जळतकर यांचे लोकवर्गणी मिडवल्याबद्दल अभिनंदन केले मुख्यध्यापका रत्नकार पाटील यांनी उपस्तीत मान्यवर चे स्वागत शाल व श्रीफसल देऊन केले कार्यक्रमचे सूत्रसंचालन भालेराव सर व आभार प्राजक्ता मॅडम यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.