रिझर्व्ह बँकेचे रेपो दर ‘जैसे थे’च !

0

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठकीनंतर आज समितीद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पुढील काही महिने महत्त्वाचे असल्याचे दास म्हणाले. त्याचबरोबर जीडीपी वाढीचा दर पुढील तिमाहित सकारात्मक राहण्याची शक्यताही यावेळी वर्तवण्यात आली. दरम्यान, रिझर्व्ह बँकेकडून यावेळीही रेपो रेटमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीला २ डिसेंबर पासून सुरूवात झाली होती.

 

कोणतेही बदल रेपो दरात करण्यात आले नाहीत. चार टक्क्यांवर रेपो दर हे कायम ठेवण्यात आले आहे. बैठकीत हा निर्णय सर्व सदस्यांच्या संमतीने घेण्यात आल्याची माहिती दास यांनी यावेळी दिली. तर दुसरीकडे ३.३५ टक्क्यांवर रिव्हर्स रेपो दरही कायम ठेवण्यात आला आहे. कोणतेही बदल बँक रेटमध्येदेखील करण्याचा निर्णय झाला नाही. ४.२५ टक्क्यांवर आणि कॅश रिझर्व्ह रेशो तीन टक्क्यांवर ते कायम असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, महागाई दर पुढील काळात नियंत्रणात येईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली.

 

पुरेशी रोख रक्कम अर्थव्यवस्थेत उपलब्ध असेल याची आम्ही खात्री देतो. त्याचबरोबर आवश्यक ती पावलेही गरज भारल्यास उचलली जातील. पुढील तिमाहीतील जीडीपी वाढीचा अंदाज वाढवून ०.१० टक्के करण्यात आला आहे. तर त्याच वेळी, चौथ्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२१ दरम्यान देशातील जीडीपी वाढ ०.७० टक्के राहिल असा अंदाज असल्याचे दास म्हणाले. त्याचबरोबर जीडीपी वाढीचा दर संपूर्ण वर्षासाठी उणे ७.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

जीडीपी वाढीचा दर पुढील तिमाहित उणे मधून सकारात्मक होण्याची शक्यता असल्याचे दास म्हणाले. अर्थव्यवस्थेला सरकारकडून देण्यात आलेल्या मदतीमुळे उभारी मिळण्यास मदत झाली आहे. तसेच मॅन्य़ुफ्रक्चरिंग पीएमआय पुन्हा एकदा एक्सपँशन मोड म्हणजेच ५० च्या वर गेला आहे आणि उत्पादन दर सप्टेंबर महिन्यात सकारात्मक झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात पीएमआय विकसित बाजारांच्या तुलनेत पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले.

 

२०१९-२० या कालावधीसाठी कमर्शिअल बँक लाभांश देणार नाही. तिसऱ्या तिमाहीत ग्राहक निर्देशांकावर आधारित महागाई ६.८ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ५.८ टक्के राहण्याची अपेक्षा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले. आरटीजीएस सेवा पुढील काही दिवसांमध्ये ग्राहकांसाठी २४ तास आठवड्याच्या सर्व दिवसांसाठी सुरू राहिल. कोणतीही मोठी रक्कम देताना बँक सुरू होण्याची किंवा बँक बंद होण्याची वेळ पाहावी लागणार नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.