राहुल गांधींशी लग्न झाल्याचा नाशिकच्या महिलेचा दावा..

0
  • अजब: गजब उत्तर महाराष्ट्रातील घटना
  • कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात गोंधळ
  • पोलिसांची धावाधाव
  • समजुत घालून महिलेची रवानगी
  • कोण कुठली सर्वच गुलदस्त्यात

नाशिक (प्रतिनिधी): तब्बल वीस वर्षांपूर्वी राहुल गांधीनी आपल्याशी लग्न केल्याचा दावा नाशिकच्या एका ४५ वर्षीय महिलेने केला आहे. नाशिकरोडच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात तिने बुधवारी (दि. १ सप्टेंबर) सदर महिलेने या विषयावरून गोंधळ घातला..

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, नाशिकरोडच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात बुधवारी एका ४५ वर्षीय महिलेने वीस वर्षांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी विवाह केल्याचा दावा केला. या महिलेने हा दावा करतांना चांगलाच गोंधळही घातला.. आपल्याकडे प्रतिज्ञापत्र असल्याचेही तिचे म्हणणे होते. बुधवारी दुपारच्यावेळी ही घटना घडली. नाशिकरोड पोलिसांनी ताबडतोब धाव घेत या महिलेची समजूत घातल्यावर प्रकरणावर पडदा पडला…
याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले की, ही महिला गोंधळ घालत असतांना पोलीस ताबडतोब घटनास्थळी हजर झाले. आणि यावेळी महिलेच्या बोलण्यात काही एक तथ्य आढळून आले नाही. या प्रकाराबत आम्ही महिलेची समजूत घातली, त्यानंतर तिने माफीदेखील मागितली.

खरं म्हणजे या संपूर्ण प्रकरणात ही महिला कोण, कुठली ह्या सर्व बाबी पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवल्या आहेत. त्यामुळे ह्या महिलेचा उद्देश हा फक्त राजकीय होता किंवा कसे याबाबत पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे. आणि याबाबत प्रसारमाध्यमांना संपूर्ण माहिती देणेसुद्धा अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे जर हे आरोप तथ्यहीन असतील तर पोलिसांनी सदर महिलेवर कडक कारवाई करणेसुद्धा अपेक्षित आहे, अन्यथा उद्या कुणीही, कुणावरही, कुठलेही आरोप करण्यास मागे पुढे बघणार नाही. जर आरोपांमध्ये तथ्य नसेल, तर या महिलेचा बोलविता धनी कोण, हे आता पोलिसांनी शोधणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.