उंबरठाण येथे डी. वाय. एफ. आय. संघटनेचा मेळावा संपन्न

0

सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील उंबरठाण येथे नुकताच तरुण युवकांचा अर्थातच डी. वाय. एफ. आय संघटनेचा मेळावा अतिशय आनंदाने मोठया संख्येने पार पडला. या मेळाव्याला खास मार्गदर्शन म्हणून डी.वाय.एफ.आय .संघाचे राज्य उपाध्यक्ष कॉ. इंद्रजित गावित यांच्या मार्गदर्शनाने आज उंबरठाण गणामध्ये येणाऱ्या ९ ग्रामपंचायतीमध्ये तरूणांना एकत्र करून संघटणेचे महत्व पटवून दिले.

तसेच डी.वाय .एफ .आय संघटना म्हणजे नुसती नावाने चालवायची नसून तर गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी तसेच तरुण युवकांना सदैव मार्गदर्शन करून त्यांना पुढील रोजगाराचे साधन कसे निर्माण करता येईल, यासाठी आपल्याला सदैव प्रयत्न करूवा लागणार आहे. अशा प्रकारे हा मेळावा बहुसंख्येने पार पडला.

मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी साथी पंचायत समिती सदस्य विजय घांगळे, साथी कॉ. रोहिणी वाघेरे राज्य कमीटी सदस्य, साथी कॉ रमेश वाडेकर, साथी कॉ चंद्रकांत वाघेरे, साथी कॉ संतू पालवा, साथी कॉ .दिगंबर चौधरी, साथी कॉ तूळशिराम खोटेर, साथी कॉ मुकूंदा गावित यांनी नियोजन करून मोठ्या प्रमाणात संघटनेची ध्येय धोरणे समजावून सांगीतले, त्याला मोठयाप्रमाणात तरूणांनी सहभाग नोंदवून सभासद झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.