राहुल अजूनही राजीनाम्यावर ठाम?

0

नवी दिल्ली | वृत्तसेवा 

लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित आणि धक्कादायक पडझडीला सामोरं जावं लागल्यानंतर काँग्रेस पक्षाचं मनोबल खचून गेलं असून पक्षाध्यक्ष राहुल गांधी अजूनही राजीनाम्यावर ठाम असल्याने पक्षात संभ्रम आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पक्षात राजीनामासत्र सुरू झालं असून आतापर्यंत 13 नेत्यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत.

लोकसभा निवडणुकीत ममोदीलाटेफपुढे पुन्हा एकदा काँग्रेसचा निभाव लागला आहे. गेल्यावेळी 543 पैकी 44 जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष यावेळी 52 जागांपर्यंतच मजल मारू शकला. 18 राज्ये व केंद्रशासित प्रदेशामध्ये पक्षाला खातेही उघडता आले नाही. या दारूण पराभवानंतर त्याचे तीव्र पडसाद काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पाहायला मिळाले. या बैठकीत पक्षातील आघाडीच्या पुत्रप्रेमावर राहुल यांनी थेट निशाणा साधलाच शिवाय तडकाफडकी आपला राजीनामाही सादर केला. पक्षाला नवं नेतृत्व शोधावं लागेल आणि त्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे राहुल बैठकीत म्हणाले. त्यावर राहुल यांनीच पक्षाध्यक्षपदी कायम राहावं, असा आग्रह सोनिया गांधींसह सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी धरला मात्र राहुल यांना ते मान्य नाही. राहुल अजूनही राजीनाम्यावर ठाम असल्याचे आज पक्षातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पक्षात मोठा पेच निर्माण झाला आहे.

पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेसच्या 13 नेत्यांनी आतापर्यंत राजीनामे दिले आहेत. त्यात पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, झारखंडचे अजयकुमार आणि आसामचे प्रदेशाध्यक्ष निपुन बोरा या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. यात आणखीही काही नेत्यांची भर पडण्याची शक्यता असल्याने येणारा काळ काँग्रेससाठी परीक्षेचा ठरणार आहे.

राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण काही वृत्तांनुसार, राहुल अजूनही राजीनाम्यावर अडून आहेत. असंही म्हटलं जात आहे की राहुल यांनी काँग्रेसच्या दोन वरिष्ठ नेत्यांना आपली रिप्लेसमेंट शोधायला सांगितली आहे. महाराष्ट्रात पक्षाचे प्रभारी अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक निकालाच्या दुसर्‍याच दिवशी राजीनामा देण्याची घोषणा केली. पंजाब काँग्रेस अध्यक्ष सुनील जाखड, झारखंड काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार आणि आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांनी सोमवारी आपले राजीनामे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे पाठवले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.