संतोष पाटील गोळीबारप्रकरणी फरार बुधा हटकर यास पाठलाग करुन शिताफिने पकडले

0

जळगाव | प्रतिनिधी 

माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून  फरार संशयीत आरोपी बुधा दला हटकर रा. हरिविठ्ठल नगर याला पोलिसांनी आर्वी ता. धुळे येथून  दि. 27 रोजी सोमवारी पाठलाग करत शिताफीने पकडले.
माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर आर्यन पार्क परिसरात गोळीबार झाला होता. या हल्ल्यातून ते बालंबाल बचावले होते. याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य संशयीत आरोपी बुधा दला हटकर हा गुन्हा घडल्यापासून फरार झाला होता. त्याच्या शोधार्थ मुंबई, पुणे, अलाहाबाद या ठिकाणी पथक पाठविण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.