पाचोरा न.पालिकातर्फे शहर स्वच्छतेसाठी ५१ हात गाड्यांचे वितरण

0

पाचोरा | प्रतिनिधी 

पाचोरा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांनी पाचोरा शहरातील स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता कर्मचारी यांना दैनंदिन उपयोगात पडणारी व कमी वेळेत आणि कमी खर्चात स्वच्छता राखता यावी यासाठी न.पालिका फंडातुन स्वच्छता हात गाड्यांचे वितरण नुकतेच करण्यात आले.
या हात गाड्यांमुळे पाचोरा शहरातील वार्डनिहायी स्वच्छता राखण्यात मदत होणार आहे. गटारी मधील घाण रस्त्यावर व रस्त्याच्या पलीकडे उघड्यावर आजपर्यंत टाकत येत होती.पण आता यानंतर या हात गाड्यांनी ती घाण कर्मचारी हे ताबडतोब हात गाडीत भरून नियोजित केलेल्या एका विशिष्ट जागेवर व ठिकाणी आता सहजरित्या घेऊन जातील अशी सोय पाचोरा न.पालिकेने केली आहे. म्हणुन आज ५१ हात गाड्यांचे वितरण केले. पुढील आठवड्यापासुन पावसाळा सुरू होत असुन या उघड्यावरील गटारीतील घाणींने दुर्ग॔धी व रोगराईचे प्रमाण वाढ यापुर्वी होत होती पण पाचोरा न.पालिकेचे व नगराध्यक्ष गोहिल यांचे सुक्ष्म नियोजबध्द निर्णयाने आता १००% आळा बसणार असुन आता यापुढे रोगराई व दुर्गंधी चे प्रमाण कमी होण्यास मदत स्वच्छता कर्मचारी यांना मिळणार आहे. यावेळी आशिर्वाद इन्फ्राचे मुकुंद बिल्दीकर उपनगराध्यक्ष शरद पाटे आरोग्य सभापती सतिष चेडे, नगरसेवक आनंद पगारे, वाल्मिक पाटील, बापु हटकर, आरोग्य अधिकारी धनराज पाटील व प्रशासकीय अधिकारी भोसले सह न.पा कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.