रास्ता अडवून लुटणारे चोरटे पोलीसांच्या ताब्यात

0

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

14 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास प्रदीप नाभिराज चौगुले रा. रुकडी ता. हातकणगले जिल्हा कोल्हापूर हे ड्रायव्हर व दोन व्यक्ती सोबत इंडिगो गाडी क्र. GJ5  RH8988 गाडीने खंबाला मार्गे जामण्यापाडा गावी ऊसतोड कामगार मजूर घेणे साठी जात असताना त्यांच्या गाडीला खंबाला गावाच्या स्मशान भूमी जवळ दोन मोटार सायकल वरील पाचजण डोक्याला कानटोपी व तोंड बांधलेले 25 ते 30 वयोगटातील इसमांनी त्यांच्या मो. सा. ली. इंडिगो गाडीला आडवी लावून इंडिगो गाडी उभी करून एकाने इंडिगो गाडीची चावी काढून व इतर चौघांनी गाडीत बसलेल्या प्रदीप चौघुले व ड्रायव्हर रवींद्र पेंढारकर यांना ब्लेड लावून खूरापती करून धमकी देऊन प्रदीप चौघुले यांच्या जवळील 72,000 हजार रुपये रोख घेऊन पळून गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

त्यावरून शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा रजि.न.102/2021 भा.द.वी कलम 395 प्रमाणे  दी.14 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली. सदर गुन्ह्याची घटना कळल्यानंतर तालुका पोलिसांची एक टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचले, लगेच तपास प्रक्रियेला सुरुवात झाली.

गुप्त बातमीदार व घटनास्थळवरील व्यक्ती व फिर्यादी यांनी सांगितलेल्या वर्णनावरून घटनेच्या लगेच चार तासात आरोपी निष्पन्न झाले. आरोपी  विनोद गंगाराम भील, रवींद्र देविदास भील, भोजू राजेंद्र भील, सागर गजमल भील अजय भाऊसाहेब कोळी. सर्व रा. नवे लोंढरे, पांडुरंग भगवान भील रा. नवे भामपुर ता. शिरपूर यांना सदर गुन्ह्यात अटक करून आरोपींनी लुटली फिर्यादी रक्कम 72,000 व त्यांनी वापरलेल्या मोटार सायकल वाहन जप्त करण्यात आल्या आहेत.

सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कुमार बछाव, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी माने शिरपूर विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोसई/ नरेंद्र खैरनार, सपोई/ भिकाजी पाटील, पोहेकॉ/ सुनील मोरे, चत्तरशिंग खसावत, पोकाँ/ योगेश मोरे, चालक सईद शेख, पोकॉ/ संजय माळी, संजय भोई, आदींच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.