रानडुकराच्या हल्ल्यात सातगाव येथील शेतकरी जखमी

0

पाचोरा,दि.,5 –
तालुक्यातील सातगाव(डोंगरी) येथील बापू सर्जेराव पवार शेतकरी आपल्या शेतावर दादर या पिकाला पाणी देत असतांना रानडुक्करांनी अचानक हल्ला चढवला यामध्ये बापू सर्जेराव पवार या शेतकर्‍याच्या शरिरावर 3 ठिकाणी चावा घेतला आहे. या शेतकर्‍याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटणेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण तयार झाले आहे आणि त्यामुळे या रानडुक्करांचा तात्काळ बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी या गावातील शेतकर्‍यांनि केली असून जखमी झालेल्या शेतकर्‍यांला तात्काळ वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे . घटनास्थळी वन क्षेत्रपाल ज्ञानेश्वर देसाई, वन रक्षक एस.टी. भिलावे यांनी भेट दिली असुन शेतकर्‍यास रानडुक्कराने चावा घेतला असल्याचे सांगुन नुकसान भरपाईसाठीचा प्रस्थाव दाखल केल्यानंतर शासनाकडुन नियमानुसार मदत मिळणार असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.