पूर्ववैमनस्यातून विद्यार्थ्यावर चाकुहल्ला

0

नाहाटा महाविद्यालय आवारात चार अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ दि . 5 –
येथील नाहाटा कॉलेज आवारात आज दि.5 फेब्रुवारी रोजी सकाळी पूर्ववैमन्यासातून एका विद्यार्थ्यावर चाकु हल्ला केल्याची घटना घडली असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. नाहाटा महाविद्यालय आवारात ही घटना अचानक घडल्याने एकच खळबळ उडाली.जखमी विद्यार्थ्यास तत्काळ गोदावरी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमी युवकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
नाहाटा महाविद्यालय आवारात आज दि.5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास कॅन्टीन जवळ निलेश गोविंदा पवार,रा.शिवपुर कन्हाळे रस्त्यावरील रहिवासी हा विद्यार्थी उभा असतांना त्याच्यावर याच शाळेतील 4-5 विद्यार्थ्यांनी मारहाण करून अचानक चाकुहल्ला केला. या घटनेमुळे महाविद्यालय आवारात एकच खळबळ उडाली.काहींच्या म्हणण्यानुसार जखमी व हल्लेखोर येथील विद्यार्थी नव्हते.कॉलेज प्रशासनास घटना समजताच त्यांनी तत्काळ पोलीसांना याबाबत कळविले. घटनेची माहिती कळताच नगरसेवक पिंटू कोठारी यांनी येत त्यास रुग्णवाहिकेने गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलविेले.
पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवून अल्पवयीन चौघाना ताब्यात घेतले.निलेश पवारच्या कमरेच्या खाली चाकुचा घाव लागल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान,जखमी निेलेश पवार व व एकात या कोणत्यातरी जुन्या वादातून काल दि.4 रोजी बाचाबाची झाली होती. त्याचाच वचपा काढण्यासाठी हा चाकु हल्ला करण्यात आला असल्याचे समजते.घडलेल्या घटनेमुळे काही काळ कॉलेज परिसरात एकच खळबळ उडून तणावाचे वातावरण झाले होते. कॉलेज मध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी तेथे ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. तसेच तेथील प्रवेशद्वारावर ओळखपत्र तपासणी करुन प्रवेश दिला जातो. याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कॉलेजमध्ये प्रवेश नसलेले युवक तेथे येतात यावर कॉलेज प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.तपास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोनि देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.निशिकांत जोशी व सहकारी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.