राज ठाकरेंच्या विरोधात अटक वॉरंट; काय आहे प्रकरण ?

0

परळी, लोकशाही न्यूज नेटवर्क

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात बीडमधील परळी कोर्टाने अटक वॉरंट बजावला आहे. जामीन करुनही सतत तारखांना गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. 2008 साली मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणी कोर्टात केस सुरु आहे.

जवळपास 13-14 वर्ष जुन्या खटल्यात आजही राज ठाकरेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आठ वर्षांपूर्वी बीडमधील अंबाजोगाईत मनसे कार्यकर्त्यांनी एसटी बसचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर राज ठाकरे सुनावणीला हजर राहत नव्हते.

दुष्काळी दौऱ्याच्या निमित्ताने दौऱ्यावर निघालेल्या राज ठाकरे यांनी सहा वर्षांपूर्वी अंबाजोगाईत हजेरी लावली होती. न्यायालयात जाऊन त्यांनी त्यावेळी तीनशे रुपयांचा दंड भरत अटक वॉरंट रद्द केले होते. या प्रकरणी परळी न्यायालयाने जामीन दिला.

नेमकं काय आहे प्रकरण?

रेल्वेत परप्रांतीयांचीच भरती केली जात असल्याबद्दल वक्तव्य केल्या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 2008 मध्ये अटक करण्यात आली होती. या अटकेचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी उमटले होते. अंबाजोगाईत मनसैनिकांनी एसटी बसेसवर दगडफेक करून महामंडळाचे नुकसान केले होते.

अंबाजाेगाई शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राज ठाकरेंना जामीन मिळाल्यांनतर ते अंबाजोगाई न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे अंबाजोगाई न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. राज ठाकरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. माने यांच्या न्यायालयासमोर हजर झाले असता तीनशे रुपये दंड घेऊन त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.