रझा अकादमीवर बंदी घाला; अन्यथा… – नितेश राणे

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रातील अनेक भागात दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्रिपूरामध्ये जमावाने मशिद पेटवल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही दिसून आले होते. रजा अकादमीनेही आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे भाजप नेते नितेश राणे यांनी रजा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

त्रिपुरामधील अफवेनंतर महाराष्ट्रातील अमरावती,नांदेड, भिवंडी या भागात मुस्लिम जमावाकडून मोर्चे काढण्यात आले होते. काही जणांनी दुकानेही फोडल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती. एकूणच दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती. यामागे रजा अकादमीचे तरूण असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं.

यामुळे नितेश राणे यांनी संतप्त भूमिका घेत रजा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील अनेक भागात जी हिंसक दंगल उसळली. त्यामागे अतिरेकी संघटना रजा अकादमीच आहे. प्रत्येक वेळेस ते शातंता भंग करतात, सर्व नियम पायदळी तुडवतात. आणि सरकार नुसत पाहत राहतं, असा घणाघात त्यांनी केला आहे.

सरकारने त्यांच्यावर बंदी घालावी, अन्यथा महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही त्यांना संपवू, असा इशारा नितेश राणेंनी दिला आहे. त्यांनी ट्वीट करून हा इशारा दिला आहे. दरम्यान रजा अकादमीची स्थापना 1978 साली करण्यात आली होती. रजा अकादमी मुख्यत: मुस्लिम समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलन करते आणि मुस्लिम विचारवंताच्या पुस्तक प्रकाशनाचे काम करते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.