‘या’ शहरात मांसाहार अन् दारुवर पुर्ण बंदी; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

0

मथुरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा शहरात मांस आणि दारूविक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यात निर्णय जाहीर केला आहे. योगी आदित्यनाथ सोमवारी हा निर्णय जाहीर केला आहे. मथुरेतील वृंदावन, गोवर्धन, नंदगाव, बरसाना, गोकुळ, महावन आणि बलदेव भागात मांस आणि दारू विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच या व्यवसायाशी निगडित व्यापारी आणि कामगारांचे इतर व्यवसायात पुर्नवसन केले जाईल असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

योगी आदित्यनाथ म्हणाले की, चार वर्षापूर्वी मथुरा, वृंदवन नगर यांची एक महानगरपालिका व्हावी अशी मागणी करण्यात आली होती, त्यानुसार इथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली. नंतर सात पवित्र स्थळांना तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला. या पवित्र ठिकाणी दारू आणि मांस विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशी जनतेची इच्छा होती. त्याप्रमाणे मथुरेत मांस आणि दारू विक्रीवर बंदी घालण्यात आहे.

मद्य आणि मांस विक्रीच्या व्यवसायात असलेल्यांना वाऱ्यावर सोडून न देता त्यांना इतर व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन आणि मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे. या व्यवसायाशी जे निगडीत लोक असतील त्यांना इतर कामाचे प्रशिक्षण देऊन इतर व्यवसायांमध्ये त्याचे पुर्नवसन केले जाईल असेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.