यावल राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे योगिता पाटीलांचे विधानसभेचे आ. शिरीष चौधरी यांना निवेदन

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

संजय गांधी निराधार योजनेच्या नवनिर्वाचित  सदस्यपदी  नियुक्ती होताच निराधारांना आधार देण्यासाठी कार्यतत्पर असणाऱ्या  संजय गांधी निराधार योजना  तालुका सदस्या तथा छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनच्या सचिव  सौ. योगिता देवकांत पाटील यांनी आपली निवड होताच संजय गांधी  समिती अध्यक्ष शेखर दादा पाटील यांचे मार्गदर्शनात नियुक्ती झाल्याबरोबर आपल्या कार्याची सुरवात करत रावेर- यावल तालुक्यातील कर्तव्यदक्ष आमदार  शिरीष दादा चौधरी यांना  निवेदन दिले.

सदर निवेदनात दिले आहे की,  संजय गांधी निराधार योजनेत व श्रावणबाळ व अपंग लाभार्थी यांना या योजनेसाठी  वयाचा दाखला व वैद्यकीय प्रमाणपत्र दाखला यावल येथून मिळवे, असे विनंती केली आहे.  कारण ज्या नागरिकांकडे  जन्मदाखला नाही, लिव्हिंग सर्टिफिकेट नाही,  व जे लोक अपंग नागरिक आहेत, त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र   मिळवण्यासाठी वैद्यकीय  अधिकारी जळगाव यांच्याकडे जावे लागते.  त्यासाठी नागरिकांची धावपळ होऊन वेळ व पैसा खर्च होतो. होणारा त्रास व गैरसोय टाळण्यासाठी करिता यावल ग्रामीण रुग्णालयात  वयाचे व अपंग व्यक्तींना वैद्यकीय प्रमाणात पत्र  मिळावे म्हणून निवेदन  देत विनंती केली.

सौ. योगिता देवकांत पाटील यांनी निराधार महिलांना आव्हान करत  या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना कसा मिळेल यासाठी समाजातील सर्वच राजकीय, सामाजिक  क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घ्यावा व अनाथ व अपंग व  निराधाराना मदत करावी. असे आवाहन  योगिता पाटील यांनी  केले. या प्रसंगी निवेदन देतांना सौ. योगिता पाटील, कविता पाटील, वाढोदा गावचे सरपंच तथा संजय गांधी  समिती सदस्य संदीप सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते संजय गांधी समिती सदस्य दिनकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे राष्ट्रवादी उंटावदचे सोसायटीचे चेअरमन शशिकांत पाटील, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा विरावली ग्रा. प. सदस्य ऍड देवकांत पाटील, राष्ट्रवादी युवकचे युवा नेते राजेश कारंडे  यांचे सह अनेक पदअधिकारी यांची उपस्थिती होती.

निवेदन देण्यापूर्वी  यावल येथील खरेदी-विक्री संघात कार्यसम्राट आमदार शिरिष दादा चौधरी यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष शेखर दादा पाटील व समितीच्या सर्व सदस्यांना आशीर्वाद रुपी अभिनंदन करत पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.