.. यामुळे जगभरातील फेसबुक सर्व्हर झालं होतं ठप्प; तब्बल इतक्या हजार कोटींचं नुकसान

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काल अचानक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook, WhatsApp आणि Instagram तब्बल ६ तासांसाठी ठप्प झालं होतं. यापैकी कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर मेसेज जात नव्हते. हे सगळे ६ तासानंतर म्हणजे भारतीय वेळेनुसार पहाटे ३ च्या सुमारास पुन्हा रिस्टोर झालं आहे. पण कोट्यवधी युजर्सचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अशाप्रकारे बंद होण्यामागे नेमकं काय घडलं याचे कारण समोर आले आहे.

Facebook, WhatsApp आणि Instagram या तीनही प्लॅटफॉर्म कंपनीच्या डोमेन नेम सिस्टममध्ये आलेल्या त्रुटीमुळे बिघाड झाला होता. त्यामुळे फेसबुकच्या मालकीचे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ठप्प झाले असल्याची माहिती मिळते आहे. हे एक असं टूल आहे, जे Facebook.com सारख्या वेब डोमेनला एका इंटरनेट प्रोटोकॉल किंवा IP Address मध्ये बदलतो.

सोमवारी फेसबुकच्या DNS रेकॉर्ड्समुळे बिघाड झाला. ज्यावेळी DNS ची चूक असते, त्यावेळी Facebook.com युजरचं प्रोफाइल पेज बनणं अशक्य होतं. DNS इंटरनेटचं फोनबुक आहे, तर BGP पोस्टल सेवा आहे. ज्यावेळी एखादा युजर इंटरनेट डेटामध्ये एन्ट्री करतो, त्यावेळी ब्रॉडर गेटवे प्रोटोकॉल म्हणजेच BGP मार्ग ठरतो, जिथे डेटा ट्रॅव्हल करू शकतो. फेसबुक लोडिंग थांबण्याच्या काळी मिनिटं फेसबुकच्या ब्रॉडर गेटवे प्रोटोकॉल-BGP मार्गात बदल करण्यात आले होते. त्यामुळे आता BGP तील बिघाडचं सांगू शकतो, की फेसबुक DNS का फेल झालं. कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सर्व्हर फेल झाल्यामुळे जगभरातील नागरिकांनाच नव्हे तर फेसबुक कंपनीच्या कर्मचाऱ्यांना देखील मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. सर्व्हर डाऊन झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे अॅक्सेस कार्ड देखील काम करणं बंद झालं होतं. सर्व्हर डाऊन झाल्याने तसेच कर्मचाऱ्यांचे देखील अॅक्सेस कार्ड काम करणं बंद झाल्याने फेसबुकने त्यांच्या कॅलिफोर्नियाच्या सँटा क्लारा डेटा सेंटरवर एक टीम पाठवली. बंद पडलेलं सर्व्हर मॅन्युअली रिसेट करण्यासाठी हे प्रयत्न सुरु होते. तिथंसुद्धा अॅक्सेस कार्ड काम करत नसल्याने कर्मचाऱ्यांना रुमचे लाॅक तोडून रुममध्ये जावं लागलं. यामुळे फेसबुकचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी माईक स्करोपफेरनं ट्विट करत सर्वांची माफी मागितली.

दरम्यान, अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर फेसबुक सेवा पुन्हा सुरळीत सुरु झाली. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 3 वाजून 24 मिनिटांनी फेसबुक सुरु झाले. तर मध्यरात्री 4 वाजता व्हाॅट्सअॅपच्या सेवा सुरु झाल्या. या समस्येमुळे एकूण 596 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. तसेच इंटरनेटवरील ग्लोबल ऑब्झर्व्हरी ‘नेटब्लाॅक्स’च्या अंदाजानुसार जगाच्या अर्थव्यवस्थेला या समस्येमुळे तब्बल 1192.9 कोटींपेक्षा अधिक नुकसान झालं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.