शिरागड येथील श्री सप्तशृंगीदेवीचे प्रवेशद्वार भाविकांसाठी खुले होणार

0

 यावल. गोकुळ कोळी, लोकशाही न्युज नेटवर्क

तापी व मानकी नदीच्या संगमावर असलेल्या शिरागड येथील निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या मंदिराचे प्रवेशद्वार कोवीड १९ चे नियम पाळुन भावीकांसाठी खुले होणार असुन आ. सौ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते घटपुजन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष शांताराम सदु सोळंके यांनी दिली.

श्री सप्तशृंगी देवीच्या गडापर्यत येणाऱ्या – जाणाऱ्या भावीकांसाठी रस्ता तयार करण्यात आला असुन विविध सुविधा पुरविण्यात येणार आहे. निवासिनी श्री सप्तशृंगी  देवीचे लहान गड म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तापी व मानकी नदीच्या संगमा जवळ निवासिनी श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. तापी नदीला पुर असल्यामुळे तुरखेडा धामणगाव मार्ग रस्ता बंद आहे.  तर कोळन्हावी येथून गडावर जाण्यासाठी होडी आहे.  साकळी  मनवेल मार्गाने दर्शनासाठी  भावीकांना जाता येणार आहे.

निवासिनी श्री सप्तशृंगी देवीच्या घटस्थापना व नवरात्रोत्सवानिमित्ताने  संस्थानमार्फत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून वही गायन, भारुडे, भजन गायन  व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

निवासिनी श्री सप्तशृंगी देवीचे मंदिर लहानगड म्हणून प्रसिद्ध आहे.  भावीकांची मनोकामना पुर्ण होऊन सुख समृद्धी देणारे दैवत आहे.  शिरागड येथे दाट अरण्य होते.  तापी नदीच्या काठावर शांत मनमोहक वातावरण उंच टेकड्या व  दऱ्याखोऱ्यात असल्यामुळे येथे रुषिमुनीचे वास्तव्य होते. जगाच्या कल्याणासाठी होम हवन जप तप रुषिमुनी करीत होते,  याची वार्ता राक्षस दैत्यसुराला कळाली होती.  त्यावेळी हाहाकार  माजला होता, यावेळी रुषिमुनीनी आराधना करत  निवासिनी श्री सप्तशृंगी  माता प्रगट झाली  व दैत्य राक्षस सुराशी युद्ध करुन त्या राक्षसचा  वध केला अशी आख्यायिका आहे.

जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिलेल्या शासनाच्या आदेशानुसार, भावीकांनी कोवीड १९ चे पालन करुन निवासिनी श्री सप्तशृंगी  मातेचे दर्शन घ्यावे असे संस्थानचे अध्यक्ष शांताराम सोळंके, सचिव तथा पो. पा. सुधाकर सोळंके, सरपंच योगीताताई सोनवणे, आण्णा सोळंके, हिम्मत सोळंके, योगेश सोळंके, शिरागड येथील ग्रामपंचायत सदस्य प्रतापदादा सोनवणे, उपरसरपंच भारतीताई सोळंके, सामाजिक कार्यकर्ता रामकृष्ण सोळंके सह शिरागड ग्रामस्थ यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.