यंदाच्या विधानसभेत महाआघाडीचे २४० आमदार निवडुन येणार – ना.गिरीश महाजन

0

शेंदुर्णी (प्रतिनिधी) :– केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशात व राज्यात चौफेर विकास सुरु आहे.जामनेर विधानसभा मतदारसंघात आपल्याला मला विजयी करून विजयाची डबल हँड्रिक करायची आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवारांना पराभुत करुन पराजयाची हँड्रिक करण्याची संधी आहे.काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांचे केवळ ४० उमेदवार निवडुन येणार असुन भाजपा शिवसेना व मित्र पक्षाच्या आघाडीचे विधानसभेत २४० आमदार निवडुन येणार आहे .मी सांगितलेला ” आकडा” बरोबरच असतो असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच जामनेर विधानसभा मतदार संघातील भाजपा शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार ना.गिरिशभाऊ महाजन यांनी शेंदुर्णीत केले.

शेंदुर्णीचे ग्रामदैवत भगवान श्री.त्रिविक्रम महाराज यांच्या मंदिरात पुजा अभिषेक करुन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी झालेल्या सभेला ना.गिरीश भाऊ महाजन संबोधित करत होते.त्यांनी राज्य व केद्र शासनाच्या वतीनं राबविण्यात आलेल्या विविध कामांची माहिती दिली.जामनेर तालुक्यातील विकास कामे,शेंदुर्णी नगरपंचायतीस दिलेल्या निधीतचन होत असलेल्या कामांची माहिती दिली.वाघुर धरणातुन शेंदुर्णी साठी मंजुर झालेल्या५५ कोटी रुपये,सर्व धर्म, समाज यांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचे कामे,दवाखाना, वैद्यकीय मदत या द्वारे कार्यकर्ते सतत जनतेच्या संपर्कात असतात. जनतेने सलग ५ निवडणुकीत मला विजयी केले असुन यंदाही १ लाखांच्या मतांनी विजयी करुन आपल्याला ईतिहास घडविण्याची संधी मिळाली आहे. विरोधी पक्ष,उमेदवार यांच्यावर टिका केली व भाजपा ,शिवसेना व आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

राष्ट्रवादी चे माजी शहराध्यक्ष भाजपात

यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे माजी शहराध्यक्ष व शेंदुर्णी शिंपी समाजाचे अध्यक्ष ,पत्रकार सुनिल शिंपी यांच्या सह,जंगीपुरा ग्रामपंचायत चे राष्ट्रवादी कडुन निवडुन आलेले सदस्य, दोंदवाडे,एकुलती येथील कार्यकर्ते यांनी भाजपात प्रवेश केला यांचा सत्कार ना.गिरिशभाऊ महाजन यांनी केला.

तत्पूर्वी भाजपचे जेष्ठ नेते उत्तमराव थोरात, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन शेंदुर्णीत ना.गिरिशभाऊ यांना मताधिक्य देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

यावेळी भाजपा ,शिवसेनेचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात चंद्रकांत बाविस्कर,नगराध्यक्षा सौ.विजया खलसे,उपनगराध्यक्षा सौ.चंदाबाई अग्रवाल, अमृत खलसे,प्रकाश झंवर, कमलाकर पाटील, राजेंद्र चौधरी,पंडीत जोहरे,नारायण गुजर,प्रफुल्ल पाटील, सुनील शिनकर,अँड. भरत पवार, तुकाराम पाटील, विजय गुजर,राजेंद्र भारुडे, अशफाक बागवान, एकनाथ कोळी,भैय्या सुर्यवंशी, विनोद नाईक, भैय्या पाटील,सर्व नगरसेवक, नगरसेविका, तसेच भाजपा शिवसेनेचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.सभेनंतर शहरातुन ना.गिरीशभाऊ महाजन यांनी प्रचार करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण केला.

Leave A Reply

Your email address will not be published.