भुसावळ नगरसेवक खरात हत्याकांड ; तिघा आरोपींना 14 पर्यंत पोलिस कोठडी

0

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळचे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले व मोठ्या बंधूंसह अन्य एकावर कट रचून आलेल्या आरोपींनी अंधाधुंद गोळीबार तसेच चॉपरसह दगडाने हल्ला करून खून केल्याची घटना रविवारी रात्री सव्वा नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेने भुसावळसह राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी शेखर उर्फ राजा हिरालाल मोघे, राजा बॉक्सर मोहसीन उर्फ अजगर खान व मयूर सुरवाडे या तासाभरात अटक करण्यात आली होती. तिघा आरोपींना आज मंगळवारी सकाळी 10.30 प्रचंड बंदोबस्तात भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 14 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यावेळी न्यायालयाला छावणीचे स्वरूप आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.