भुसावळात निवडणूक,नवरात्रोत्‍सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचे पथसंचलन

0

भुसावळ-आगामी विधानसभा निवडणुक व नवरात्रोत्सव सणाच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळात पोलिसांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत पथसंचलन केल्याने नागरीकांमधून सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. शहर पोलिस ठाण्यापासून पथसंचलनास सुरूवात झाली. महात्मा गांधी पुतळा,जळगाव रोड,गवळी वाडा,दगडी पूल, पांडुरंग टॉकीज,वाल्मीक नगर, नृसिंह मंदीर, जवाहर डेअरी, अप्सरा चौक, मोठी मशीद, सराफ बाजार, गांधी चौक, पोस्ट कार्यालय, अमरदीप टॉकीज, रजा टॉवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील रेल्वे स्टेशनजवळील पोलिस चौकीजवळ पथसंचलनाचा समारोप झाला.

नवरात्रोत्सवाच्या काळात आणि विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, कोणी उपद्रवी असल्यास त्यांच्यावर कारवाई करणे सोपे व्हावे यासाठी एसआरपीच्या जवानांना महत्वपूर्ण ठीकाणांची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. पथसंचलनाचे  नेतृत्व  उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांनी केले. यावेळी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, निरीक्षक दिलीप पगारे, होमगार्डचे प्रमुख नरविरसिंग रावळ आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.