दुर्धर आजाराला कंटाळून मुलीची हत्या करणाऱ्या पित्याला अटक

0

यावल – न्हावी (ता. यावल) येथील विहिरीत पाच वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला होता. मुलीच्या दुर्धर आजाराला कंटाळून बापाने तिला विहिरीत ढकलून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी त्याने फैजपूर पोलिसांना कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याला मध्य प्रदेशातून न्यात अटक केली.

‘न्हावी (ता. यावल) गावात मारूळ रस्त्यावर ठुशा भावलाल बारेला ३२ हा कुटुंबासह राहतो. गुरुवारी तो आपल्या ५ वर्षीय मुलीस घेवून घरातून निघाला होता. तेंव्हापासून त्याच्यासह मुलगी अनिता बारेला हे बेपत्ता होते. शनिवारी सायंकाळी मुलीचा मृतदेह गावालगत असलेल्या सुनील फिरके यांच्या शेत विहिरीत आढळला मुलगी वडिलांसोबतच गेली होती त्यामुळे पोलिसांचा वडिलांवर संशोधता पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पकडले त्याची चौकशी केली असता मुलीला दुर्धर आजार असल्याने आपणच तिचा खून केल्याची कबुली त्याने दिली याप्रकरणी त्याला अटक करण्यात आले असून लवकरच न्यायालयात उभे करण्यात येणार आहे याबाबत भरपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सपोनी निलेश वाघ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.