मोसंबीचा भाव घुटमळतोय २० ते २५ हजार टनाभोवती

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मागील दि. २८ सप्टेंबरसह अतिवृष्टीच्या व सततच्या पावसामुळे जमिनीत पाणी मुरल्याने तयार झालेल्या बुरशीमुळे वाफमळ झाली. अतिवृष्टीच्या पावसाचा  व वातावरणातील बदलावाचा मोठा फटका बसला आहे. मोसंबी झाडांवर बहरलेले मोसंबी फळ चक्क जमिनिवर गळुन पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. झाडांवर निम्मा मोसंबी फळ शिल्लक आहेत.

सध्या मोसंबीला २० हजार ते २५ हजार रुपये प्रति टन  दरम्यान भाव घुटमळत व मिळत आहे. कुठे मोसंबी तोड झाली तर कुठे मोसंबीला चांगला भाव मिळेल. या अपेक्षेने मोसंबी फळ झाडांवरच पिवळे होतांना दिसत आहेत. मोसंबी बागांचे निम्याने नुकसान झाले असुन मोसंबीला ३० हजार रुपये टनापुढे भाव मिळावा. अशी अपेक्षा भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र.ब सह इतर गावातील मोसंबी उत्पादक शेतकरी वर्गातुन होतांना दिसत आहे.

भडगाव तालुक्यात ५०० हेक्टरजवळपास  क्षेञात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी मोसंबी पिकाची लागवड केली आहे.  बांबरुड प्र ब, वाडे, नावरे, दलवाडे, गोंडगाव, घुसर्डी, सावदे, कनाशी, घुसर्डी, बोरनार, बोदर्डे, कोळगाव, भट्टगाव, पिंपळगाव बुद्रुक, बांबरुड प्र ऊ, मांडकी, भडगाव, वडजी, पांढरद, पिचर्डे, जुवार्डी यासह तालुक्यात मोसंबी बागा हिरवळीच्या झाडांनी बहरल्या आहेत.

सध्या मोसंबीचा आंबेबहार सुरु आहे. यावर्षी मोसंबी बहार चांगलाच फुटुन फळ बहारही चांगला लागला होता. माञ दि. २८ सप्टेंबरसह अतिवृष्टीचा सततचा पाऊस मोसंबीला मारक ठरला. जमिनीत पाणी साचल्याने जमिनीत बुरशीमुळे वाफगळ झाली. वातावरणाचा बदलावाचाही फटका बसला. त्यामुळे झाडावरची ५० टक्के मोसंबी फळ जमिनीवर गळुन पडले. शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाच्या आशेवर अतिवृष्टीच्या पाऊसानेही पाणी फेरल्याचे दिसुन आले. मोसंबी झाडांवरचा निम्मा मोसंबी फळ माल गळुन मोठे आर्थिक नुकसान झाले. मोसंबी झाडांवर निम्माच माल शिल्लक राहीला होता.

मागील महिन्यांपुर्वी मोसंबीला १८ हजार ते २० हजार रुपये प्रति टन भाव जवळपास  मिळाला होता. काही शेतकऱ्यांनी मोसंबी माल व्यापाराला दिला होता. पुन्हा माल गळती होईल कि काय? या कारणाने काही शेतकऱ्यांनी मोसंबी माल व्यापाऱ्याला देण्याचा निर्णय घेतला होता. तर काही शेतकऱ्यांनी मोसंबीला चांगला भाव मिळेल या आशेने मोसंबी माल न तोडता राखुन ठेवला होता.

सध्या मोसंबीला २० हजार रुपये ते २४ हजार, २५ हजार रुपये प्रति टनाप्रमाणे भाव मिळत आहे.  आता मोसंबीचा बाजारभाव वाढण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. सध्या मोसंबी फळावर डास, पाकळी किडीचा प्रादुर्भाव सुरु असल्याचे दिसुन आले. मोसंबी झाडांवर निओथ्रीन प्रति पंप ३० मिली फवारणी करतांना शेतकरी दिसुन आले. याचा चांगला फायदा होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.