मोलकरणीवर अत्याचार करणाऱ्या वकिलाविरूध्द गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

जळगाव शहरात  घरात काम करणार्‍या एका मोलकरणीवर अत्याचार करून तिचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करणार्‍या वकिलाच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेश साहेबराव गवई (रा. श्यामनगर) या वकिलाच्या घरी पीडित महिला मोलकरणी म्हणून काम करीत होती. या दरम्यान त्याने पीडितेशी प्रेमसंबंध निर्माण केले. पीडितेच्या पतीस देखील त्याने या संबंधांची माहिती दिली. त्यामुळे पतीने पीडितेशी नाते तोडले. त्यानंतर गवईने पीडितेला धमक्या देण्यास सुरुवात केली. यातच त्या महिलेचे आधी चित्रीत केलेले व्हिडीओ व्हायरल करून तिची बदनामी देखील केली.

या प्रकरणी पीडित महिलेने मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गवईच्या विरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार विनयभंग व आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या वकिलावर आधी सरकारी अभियोक्ता असतांना एसीबीने कारवाई देखील केली होती अशी माहिती समोर आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.